औंध : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीबाबत (Satara District Bank Election) राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Balasaheb Patil) यांनी सुर्ली विकास सेवा सोसायटीचे मतदार व ग्रामस्थांची भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी कराड उत्तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष देवराज पाटील, सभापती प्रणव ताटे, सह्याद्रीचे संचालक रामदास पवार, बाळासाहेब सूर्यवंशी, सी .बी. कदम, सुरेश पाटील, ॲड. दादासाहेब जाधव, अधिक सुर्वे, हिंदकेसरी संतोष वेताळ, सरपंच दत्तात्रय वेताळ, सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील भीमराव ढमाले, उत्तम वेताळ यांच्यासह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. हिंदकेसरी संतोषआबा वेताळ यांनी स्वागत केले. दत्तात्रय वेताळ यांनी आभार मानले.