
man udu udu jhala
‘मन उडू उडू झालं’(Man Udu Udu Jhala) ही मालिका झी मराठीवर नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आली. या मालिकेत हृता दुर्गुळे(Hruta Durgule) आणि अजिंक्य राऊत(Ajinkya Raut) ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. सुरुवातीपासूनच्या भागापासून प्रेक्षकांनी या मालिकेला पसंती दर्शवली आहे. आता या मालिकेतील कलाकारांनी प्रमोशनसाठी चक्क हवेत झेप घेतली आहे. हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हॉट-एअर बलूनची(Hot Air Balloon Ride For Man Udu Udu Jhala Promotion) सैर केली आहे.
‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील हृता दुर्गुळे आणि अजिंक्य राऊत हे कलाकार हॉट एअर बलून सैरसाठी अगदी उत्सुक होते. त्यांनी याचा मनसोक्त आनंद घेतला. तसेच या हॉट-एअर बलूनमध्ये मालिकेचे काही सीन देखील चित्रित करण्यात आले आहेत जे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळतील. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा वेगळा अनुभव असेल.
याबद्दल बोलताना हृता म्हणाली, “मला अजूनही विश्वास बसत नाही आहे की आम्ही अशी ॲक्टिव्हिटी केली. हे माझ्या कल्पेनेच्या पलीकडचं होतं. मन उडू उडू झालं म्हणत आम्ही खरोखरच उडतोय.”
[read_also content=”कंटेंट क्वीन एकता कपूरच्या आगामी ‘ए कोल्ड मेस’मध्ये दिसणार फ्रेश नवी जोडी https://www.navarashtra.com/entertainment-news-marathi/new-couple-will-be-seen-in-ekta-kapoors-cold-mess-nrsr-188778/”]
या अनोख्या अनुभवाबद्दल बोलताना अजिंक्य म्हणाला, “मन उडू उडू झालं या मालिकेला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत याचा आम्हाला खूप जास्त आनंद आहे. उडू उडू या शब्दाशी संदर्भ लागणाऱ्या सगळ्या गोष्टी या मालिकेमुळे आम्हाला अनुभवायला मिळत आहेत आणि ही ॲक्टिव्हिटी देखील त्याचाच एक भाग आहे. प्रेक्षकांनी आमच्यावर असंच प्रेम करत राहावं आणि त्यांच्या अफाट प्रेमाने आमची मालिकादेखील लोकप्रियतेची गगनभरारी घेतेय असं म्हणेन.”