
pakistan video
‘राष्ट्रीय संसद आहे की मासळी बाजार.’ अशा प्रश्न विचारावा लागेल एवढा गोंधळ मंगळवारी पाकिस्तानी संसदेमध्ये(Chaos In Pakistani Parliament) पाहायला मिळाला. फाईल्सने हल्ला, शिव्या, आरडाओरड अन् एकमेकांवर धावून जाण्याचा प्रयत्न असा सारा संसदेमधील गोंधळ देशातील जनतेने वृत्तवाहिन्यांवर लाईव्ह पाहिला.
The appalling scenes, #PTI‘s #swearing & #hooliganism in #Pakistan‘s #parliament today have 1 & only 1 reason – @ImranKhanPTI.
He brings the worst out of everyone in his party by rewarding those who use abusive language, #indecency & even #violence against his political rivals. pic.twitter.com/81H4EBHmBB — Marriyum Aurangzeb (@Marriyum_A) June 15, 2021
पाकिस्तानमधील कनिष्ट सभागृह म्हणजेच नॅशनल असेंब्लीमध्ये प्रचंड गोंधळ झाल्याचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. कनिष्ठ सभागृहामध्ये सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी एकमेकांचा मान सन्मान न करता थेट शिव्या देण्यास सुरुवात केली.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात पंतप्रधान इम्रान खान यांच्या पीटीआय आणि विरोधी पक्षातील खासदारांनी एकमेकांना फाईल्स फेकून मारल्या. केवळ एकमेकांना शिव्या देऊन आणि आरडाओरड करुन समाधान झालं नाही म्हणून हे खासदार एकमेकांना मारण्याचाही प्रयत्न करत होते. पाकिस्तानी खासदारांनी एकमेकांना आया-बहिणींवरुन शिव्या दिल्याचंही प्रसारमाध्यमांनी म्हटलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिला खासादारांसमोरच हा शिवीगाळ सुरु होता. पाकिस्तानी संसदेमध्ये महिला लोकप्रितिनिधींसमोरच खासदार एकमेकांबद्दल अपशब्दाचा वापर करताना दिसून आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आलं.
[read_also content=”कोविशिल्डच्या दोन डोसमधलं अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला ? नाना पटोलेंनी मोदी सरकारला विचारला सवाल https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/nana-patole-asked-on-whose-suggestion-gap-between-two-jabs-of-covishield-is-increased-by-centra-government-nrsr-143121/”]
संसदेच्या कनिष्ठ सभागृहामध्ये अर्थसंकल्पावरुन वाद झाला. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे धाकटे बंदू शहबाज शरीफ हे सभागृहाला संबोधित करत होते. मागील आठवड्यामध्ये इम्रान खान सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयी शहबाज शरीफ बोलत होते. मात्र त्याचवेळी सत्ताधारी इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षाचे खासदार अली अवान आणि एका विरोधी पक्षाच्या खासदाराने आरडाओरड सुरु केला. ते एकमेकांना शिव्या देऊ लागले. शिव्या देतानाच अली अवान यांनी त्यांच्या हातातील पुस्तक विरोधी पक्षातील खासदाराकडे भिरकावले. त्यानंतर पाहता पाहता सर्वच खासदार एकमेकांकडे वस्तूंचा मारा करु लागले आणि संसदेला जणू युद्धभूमीचे स्वरुप आले.
पीएमएल-एनच्या खासदार मरियम औरंगजेब यांनी इम्रान खान यांच्यावर पंतप्रधानांनी संसदीय व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला. इम्रान खान यांचा हाच नवा पाकिस्तान आहे जिथे फॅसिस्ट शक्तींचं वर्चवस्व आहे. इम्रान यांच्यामध्येही फॅसिस्ट मानसिकता दिसून येते. इम्रान यांनी देशाच्या संसदेला लाचार बनवलं आहे. त्यांनी पाकिस्तानमधील लोकशाहीची कंबर मोडलीय. हीच इम्रान यांची रियासत-ए-मदीना आहे, अशा शब्दांमध्ये मरियम यांनी पंतप्रधानांवर टीका केली.