नागपूर (Nagpur). ड्रेस, वाहन पार्किंग, ट्यूशन फी, मंथली सेमिनार (dress, vehicle parking, tuition fees, monthly seminars) अशी विविध कारणे सांगत विद्यार्थ्यांच्या पालकांकडून (parents of students) अव्वाच्या सव्वा ‘फी’ वसूल करणाऱ्या शाळांविरुद्ध (The school) पालकांकमध्ये संताप वाढत चालला आहे. मागील वर्षभरापासून शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण (online education) देणे सुरू आहे. तरीही इंग्रजी माध्यमांच्या काही शाळांनी (English medium schools) पालकांना वारेमाप शुल्क भरा; अन्यथा विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करा, अशी तंबी दिली आहे. या मनमानी विरुद्ध काही पालक संघटनांनी रस्त्यावर उतरून एल्गार पुकारला आहे.
[read_also content=”गोंदिया/ गवतापासून जैविक इंधन बनविण्याच्या प्रोजेक्टवर काम सुरू; पेट्रोल आणि डिझेलला ठरणार पर्याय https://www.navarashtra.com/latest-news/work-on-a-project-to-make-biofuels-from-grass-petrol-and-diesel-will-be-an-alternative-nrat-141813.html”]
खासगी शाळांच्या फी वाढी विरोधात नागपुरात आज पालक संघटनांनी थाळी बजाव आंदोलन केले. या आंदोलनात पालक सुद्धा सहभागी झाले होते. पालकांनी शासन आणि खासगी शाळांचा थाली वाजवत निषेध नोंदवला. अनेक खाजगी शाळा या सरकारच्या नियमांचं पालन करत नाहीत, असा आरोप पालक संघटनांनी केला.
शाळा व्यवस्थापन आपली मनमानी करत फी वसूल करत आहे. कोरोनाच्या काळात सुद्धा अनेक शाळांनी शाळा बंद असताना सुद्धा फी वसूल केली. ज्यांनी फी भरली नाही त्यांना शाळेतून काढण्यात आलं आहे, असा मनमानी कारभार या शाळा करत आहे. त्यांचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. अमित होसिंग पदाधिकारी पालक संघटना यांनी सांगितलं आहे.
शाळा १४ जूनला सुरु
पुढील शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये सोमवार 14 जून 2021 रोजी शाळा सुरू करण्यात येतील. तर, जून महिन्यातील विदर्भाचे तापमान विचारात घेता उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सोमवार 28 जून 2021 रोजी शाळा सुरू होतील. या संदर्भात शिक्षण संचालकांकडून नुकतेच सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना एका पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळातून उन्हाळयाची व दिवाळीची सुट्टी याबाबत सुसूत्रता राहावी म्हणून शिक्षण संचालनालयामार्फत दरवर्षी शैक्षणिक वर्षातील सुट्ट्यांची निश्चिती करण्यात येते. त्यानुसार सुट्यांबाबत या सूचना जिल्यातील सर्व मान्यताप्राप्त शासकिय अशासकिय प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व सैनिक शाळा यांना देण्यात आल्या आहेत.
वार्षिक सुट्ट्या कमी ठेवा
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव अगर नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी ती समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकारी (प्राथमिक /माध्यमिक) यांच्या परवानगीने देण्यात येते.माध्यमिक शाळा संहिता नियम 52.2 नुसार शैक्षणिक वर्षातील सर्व प्रकारच्या एकूण सुटटया 76 दिवसापेक्षा जास्त होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी.