Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शुभमन गिलकडून नवीन तरुण खेळाडूंना संधी; ‘हे’ तीन युवा खेळाडू करणार पहिल्यांदाच पदार्पण

IND vs ZIM 1st T20 Match : विश्वचॅम्पियन बनलेल्या टीम इंडियातील अनेक खेळाडूंना विश्रांती देत शुभमन गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघात तरूण खेळाडूंचा समावेश आहे. पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय क्रिकेट संघातील तीन नवीन खेळाडूंनी पदार्पण केले आहे. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया या सामन्यात प्रथम गोलंदाजी करीत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jul 06, 2024 | 08:26 PM
Three Players Debut in Indian T20 Team

Three Players Debut in Indian T20 Team

Follow Us
Close
Follow Us:

Three Players Debut in Indian T20 Team : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना हरारे स्पोर्ट्स क्लब येथे खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना या सामन्यातून टी-२० आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्याची संधी मिळाली. या तिन्ही खेळाडूंनी आयपीएल २०२४ मध्ये चमकदार कामगिरी केली होती. त्यामुळे बीसीसीआयने या मालिकेसाठी या तीन खेळाडूंची निवड केली होती.

रियान परागने पदार्पण करताच रचला इतिहास
या तिन्ही खेळाडूंची इतर अनेक भारतीयाप्रमाणे टीम इंडियासाठी खेळण्याचे स्वप्न होते, जे आज सत्यात उतरले आहे. आयपीएलमध्ये अभिषेक शर्मा सनरायझर्स हैदराबादकडून, तर ध्रुव जुरेल आणि रियान पराग राजस्थान रॉयल्सकडून खेळतात. या तिन्ही खेळाडूंना भारतीय संघात टी-२० मध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. गिलच्या नेतृत्वात झिम्बाब्वे दौऱ्यात या तिघांचं भारतासाठी खेळायचं स्वप्न साकार झाले. या दरम्यान रियान परागने पदार्पण करताच इतिहास रचला आहे. भारतासाठी पदार्पण करणारा रियान आसामचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. काही दिवसांपूर्वी महिला संघात आसामच्या उमा छेत्रीने भारतासाठी पदार्पण केलं होतं. ईशान्य भारतासाठी हा खूप मोठा क्षण आहे.
अभिषेक शर्माकडून खूप अपेक्षा
टीम इंडियाचा माजी टी-२० कर्णधार रोहित शर्माने टी-२० वर्ल्ड कप संपल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहित शर्मा कर्णधार तसेच टीम इंडियाचा सलामीवीर होता. ज्यांनी विश्वचषकादरम्यान भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अशा स्थितीत विश्वविजेत्या संघाला टी-२० फॉरमॅटमध्ये मजबूत सलामीवीराची गरज आहे. त्यामुळे चाहत्यांना अभिषेक शर्माकडून मोठ्या अपेक्षा आहेत. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात अभिषेक शर्माने अनेक दमदार खेळी खेळल्या. सनरायझर्स हैदराबादला अंतिम फेरीत नेण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. अशा परिस्थितीत अभिषेक शर्माला सलामीवीर म्हणून स्वत:ला सिद्ध करायचे आहे.
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत : शुबमन गिल (कर्णधार), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, आवेश खान, मुकेश कुमार, खलील अहमद.

झिम्बाब्वे: तदिवनाशे मारुमणी, इनोसंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कर्णधार), डिओन मायर्स, जोनाथन कॅम्पबेल, क्लाइव्ह माडेंडे (विकेटकीपर), वेस्ली माधवेरे, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुझाराबानी, तेंडाई चतारा.

Web Title: Ind vs zim match 1st t20 three young players make their debuts in indian team shubman gill leads the way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2024 | 08:26 PM

Topics:  

  • ICC T20 World Cup 2024
  • Shubman Gill

संबंधित बातम्या

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता
1

Asia Cup 2025 : स्पर्धेआधी होणार निवडीबाबत 4 मोठे अपडेट्स, हे खेळाडू बाहेर पडण्याची शक्यता

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण
2

जसप्रीत बुमराहच्या ‘वर्कलोड मॅनेजमेंट’वर चाहत्यांची टीका! ‘या’ स्टार गोलंदाजाने केली ‘यॉर्कर किंग’ची पाठराखण

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’
3

Yuvraj Singh on Shubman Gill: शुभमन गिलच्या इंग्लंडमधील यशावर युवराज सिंगचे कौतुक; म्हणाला- ‘टीकाकारांच्या तोंडावर चपराक!’

ICC वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माची लाॅटरी! तर ‘या’ भारतीय खेळाडू पहिल्या स्थानी विराजमान, बाबर आझमचे मोठे नुकसान
4

ICC वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माची लाॅटरी! तर ‘या’ भारतीय खेळाडू पहिल्या स्थानी विराजमान, बाबर आझमचे मोठे नुकसान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.