इटली : इटलीतील रोम येथे सुरु असलेल्या स्विमिंग स्पर्धेत भारतीय जलतरणपटू साजन प्रकाश याने नवा इतिहास रचलाय. त्याने बटरप्लाय प्रकारात 200 मीटर अंतर अवघ्या 1 मिनिट 56:38 सेकंदात पार केले. या कामगिरीसह त्याने ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले.
दरम्यान भारताकडून ऑलिम्पिकसाठी ‘ए’ स्टँडर्ड पात्र ठरलेला तो पहिलाच जलतरणपटू ठरला आहे. आतापर्यंत भारताच्या अनेक जलतरणपटूंनी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवला होता. परंतु कोणालाही ए क्वालिफिकेशन मार्कसह थेट पात्रता सिद्ध करता आली नव्हती.
[read_also content=”ईडीकडून अनिल देशमुखांना पुन्हा समन्स, मंगळवारी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश https://www.navarashtra.com/latest-news/ed-summons-anil-deshmukh-again-orders-him-to-appear-for-questioning-on-tuesday-nrdm-147676.html”]
27 वर्षीय साजन याआधी 2016 रिओ ऑलिम्पिकसाठी पात्रता सिद्ध केली होती. मात्र यावेळी ‘ए’ स्टँडर्डमध्ये पात्र ठरण्यास तो अवघ्या 0.1 सेकंदाने कमी पडला होता. केरळच्या या जलतरणपटूने हार न मानत कठोर परिश्रम घेत अखेर 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात थेट पात्रता सिद्ध करुन ऑलिम्पिकची यंदाची वारी पक्की केलीये. केरळचा हा जलतरणपटू सातत्याने कामगिरीत सुधारणा करताना दिसतोय. मागील आठवड्यात त्याने बेलग्रेड स्पर्धेत 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात 1 मिनट 56.96 सेकंदाची वेळ नोंदवली होती.