कोल्हापुरातून गोवा तासाभरात
आपल्या 18 व्या वर्धापनदिनानिमित्त इंडिगो एअरलाइनने प्रवाशांसाठी एक मोठी ऑफर आणली आहे. या देशांतर्गत सेवा देणाऱ्या विमान कंपनीने त्यांच्या फ्लाइट तिकिटांवर 18 टक्क्यांपर्यंत सूट जाहीर केली आहे. ही ऑफर पुढील चार दिवसांसाठी वैध असेल. याशिवाय, इंडिगो नोव्हेंबरच्या मध्यात निवडक फ्लाइटमध्ये ‘बिझनेस क्लास’ सीटची सुविधा सुरू करणार आहे.
कंपनीचा नफा 2,729 कोटींवर
इंडिगो एअरलाईन चालवणाऱ्या इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडने ही ऑफर जाहीर केली आहे. जेव्हा कंपनीचे जून तिमाहीतील निकाल काही विशेष आलेले नाहीत. वार्षिक आधारावर कंपनीच्या निव्वळ नफ्यात 12 टक्क्यांनी घट झाली असून, तो 2,729 कोटी रुपये झाला आहे. दरम्यान, कंपनीने आपल्या या ऑफरबाबत म्हटले आहे की, प्रिय इंडिगो ग्राहकांनो, ‘हॅप्पी इंडिगो डे’ सेलसह फ्लाइट्सवर 18 टक्के सवलत मिळवा. ही ऑफर 8 ऑगस्ट 2024 पर्यंत वैध असणार आहे. सवलत मिळवण्यासाठी ‘HAPPY18’ कोड वापरा. अशी माहिती ऑफरबद्दल, एअरलाइनने दिली आहे.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)
हेही वाचा : ‘या’ कन्स्ट्रक्शन कंपनीला मिळाले महाराष्ट्र सरकारकडून काम; शेअरमध्ये मोठी उसळी!
काय आहेत अटी आणि नियम?
– ही ऑफर 31 मार्च 2025 पर्यंत प्रवासासाठी वैध आहे.
– ही ऑफर निर्गमनाच्या किमान तीन दिवस आधी केलेल्या फ्लाइट आणि ॲड-ऑन बुकिंगसाठी वैध आहे.
– ही ऑफर सर्व इंडिगो डायरेक्ट फ्लाइट्सवर वैध आहे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय आणि त्यात कोडशेअर फ्लाइटचा समावेश नाही.
– ही सवलत फक्त मूळ भाड्यावर लागू आहे, ज्यात विमानतळ शुल्क, सरकारी कर आणि शुल्क समाविष्ट नाही.
इंडिगो कंपनीकडून मोठी घोषणा
याशिवाय इंडिगोने प्रथमच बिझनेस क्लासची घोषणा केली आहे. बिझनेस क्लास तिकिटाची सुरुवातीची किंमत 18,018 रुपये आहे. काही अपवाद वगळता सर्व मेट्रो मार्गांवर बिझनेस क्लास सेवा उपलब्ध असेल. एअरलाइन्सनुसार, पहिला मार्ग दिल्ली-मुंबई असेल. या वर्षी नोव्हेंबरपासून ही विमानसेवा सुरू होणार आहे. इंडिगो देशातील सर्वात व्यस्त व्यावसायिक मार्गांवर इंडिगो स्ट्रेच नावाचे विशेष व्यावसायिक उत्पादन देखील लॉन्च करत आहे. इंडिगोच्या 12 मार्गांवर ‘बिझनेस क्लास’ सीट्स असतील. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
‘या’ कंपन्याही पुरवतात बिझनेस क्लास सेवा
सध्या, देशांतर्गत उड्डाणांसाठी टाटा समूहाच्या मालकीची एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि विस्तारा बिझनेस क्लासची सेवा पुरवतात. अशातच आता एअरलाइन कंपनी इंडिगो देखील बिझनेस क्लास सेवा सुरू करणार आहे. कंपनी नोव्हेंबरच्या मध्यात 12 देशांतर्गत मार्गांवरील फ्लाइटमध्ये ‘बिझनेस क्लास’ सीट्सची सेवा सुरू करणार आहे. येत्या मंगळवारपासून याच्या सीट्ससाठी बुकिंग सुरू होणार आहे. ‘बिझनेस क्लास’ ची सेवा सर्वात व्यस्त मार्गांवर तसेच राष्ट्रीय राजधानी दिल्लीतून निवडक फ्लाइटसह व्यावसायिक मार्गांवर देखील ही सेवा उपलब्ध असेल. असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.