भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक इरफान खान यांची आज दुसरी जयंती आहे. ३० वर्षे इंडस्ट्रीला अनेक उत्तम चित्रपट देणाऱ्या इरफान यांनी २९ एप्रिल २०२० रोजी जगाचा निरोप घेतला. पद्मश्री आणि जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित झालेल्या या अभिनेत्याला इंडस्ट्रीत स्थान मिळवण्यासाठी वर्षानुवर्ष संघर्ष करावा लागला, मात्र आज संपूर्ण जगाला त्यांच्या प्रतिभेचं वेड आहे. आज या दिवंगत अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्या आयुष्याशी संबंधित काही खास गोष्टी-
आईची इच्छा होती की इरफान यांनी इग्रंजी शिकावं
अभिनेता इरफान खान यांचा जन्म पठाण कुटुंबात झाला होता. जे टायरचा व्यवसाय करत होते. आई सईदा बेगमची इच्छा होती की इरफान यांनी इग्रंजी शिकावं. त्यांनी इरफान यांना इंग्रजी शाळेत दाखल केलं. मात्र त्यांना इंग्रजी शिकण्यात रस नव्हता त्यांमुळे त्यांना रोज शाळेत शिक्षा मिळत होती.
लग्नासाठी करणार होते धर्मांतर
सुतपा सिकदर सोबत लग्न करण्यासाठी इरफान हिंदू धर्म स्विकारण्यासाठी सुद्धा तयार होते. मात्र जेव्हा दोघांच्याही कुटुंबियांनी लग्नाला परवानगी दिली तेव्हा त्यांनी धर्म बदलला नाही.
अभिनेता नव्हे क्रिकेटर व्हायचं होतं
इरफान यांमा लहानपणापासून क्रिकेट खेळण्याची आवड होती. त्यांना क्रिकेटर व्हायचं होतं. मात्र कुटुंबियांनी साथ दिली नाही. सीके नायडू ट्रॅाफी अंडर २३ टीममध्ये निवड झाली होती. या मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यास पुढील क्रिकेट स्पर्धेत खेळायची संधी मिळणार होती. पण पैशांअभावी इरफान खानला क्रिकेटमध्ये करिअर करता आलं नाही.
फिल्मी दुनियेत येण्यासाठी करावा लागला संघर्ष
इरफान खान यांना फिल्मी दुनियेत येण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला. १९८७ मध्ये नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून शिक्षण घेतल्यानंतर
सलाम बॅाम्बे या चित्रपटात एक छोटाशी भूमिका मिळाली. या चित्रपटापासून त्यांची बॅालिवूड कारकीर्द सुरू झाली. त्यांना चित्रपटात काम मिळू लागलं. २००३ मध्ये रिलीज झालेल्या ‘मकबूल’ चित्रपटानं इरफान खान यांना ओळख मिळवून दिली. पंकज कपूर आणि तब्बू यांची भूमिका असलेल्या चित्रपटात इरफान यांचं समिक्षकांकडून खूप कौतुक झालं. त्यानंतर त्यांनी कधीच मागं वळून पाहिलं नाही. यानंतर २००५ मध्ये रोग चित्रपटात पहिल्यांदा नायकाची भूमिका मिळाली.या चित्रपटातील इरफानच्या अभिनयानं सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं. ‘इरफानच्या शब्दांपेक्षा त्याचे डोळे बोलतात, असं म्हणटंल जाऊ लागलं.
इरफान यांचे काही लोकप्रिय चित्रपट
पान सिंग तोमर, हैदर,लाईफ ऑफ पाय, तलवार,लंच बॅाक्स, स्लमडॅाग मिलेनियर, लाईफ इन अ मेट्रो,पीकू, हिंदी मिडीयम, अंग्रेजी मिडियम या चित्रपटातील इरफान यांची भूमिका लोकांच्या आजही लक्षात आहे.
२९ एप्रिल २०२० घेतला जगाचा निरोप
मार्च २०१८ मध्ये इरफान यांनी न्यरो इंडोरक्राईन ट्यूमरवरील उपचारसाठी लंडन गाठलं. याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत त्यानं चाहत्यांना ही माहिती दिली होती. जवळपास १ वर्ष उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले. २८ एप्रिल २०२० ला तब्येत बिघडल्यानंतर मुंबईतील रुग्णालयात भर्ती करण्यात आलं. मात्र उपचारदरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली. आपल्या दमदार अभिनयानं बॉलिवूडला एका नव्या शिखरावर नेणारे अभिनेता इरफान खान आता या जगात नाही. मात्र आजही त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात त्यांच स्थान अबाधित आहे.