फोटो सौजन्य- iStock
राज्यातील पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठीच्या भरती प्रक्रियेची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. ही भरतीप्रक्रिया थेट मुलाखतीद्वारे होणार आहे. ही मुलाखत 04 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 02 ते संध्याकाळी 05 या वेळेमध्ये आयोजित केल्या जाणार आहेत, इच्छुक तसेच पात्र उमेदवाराने सदर भरतीप्रक्रियेसाठीचा अर्ज जाहिरातीमध्ये देणात आला आहे तो डाऊनलोड करुन पूर्ण भरावा. त्यासोबत मुलाखतीला 4 सप्टेंबर रोजी हजर राहावे.
पदे आणि जागा
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 11 जागा
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 05 जागा
वैद्यकीय अधिकारी : 03 जागा
मानसोपचार तज्ञ : 02 जागा
नाक, कान व घसा तज्ञ : 01 जागा
शैक्षणिक पात्रता
सर्व पदासाठी त्या त्या विषयातील पदवी आवश्यक आहे अनुभवी उमेदवारास प्राधान्य दिले जाणार आहे. यासंबंधी सविस्तर माहिती ही जाहिरातीमध्ये देण्यात आली आहे.
वयोमर्यादा
या भरतीप्रक्रियेसाठी कमाल वयोमर्यादा ही 70 वर्ष इतकी आहे. वयाच्या 60 किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या उमेदवाराने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडून प्राप्त केलेल्या शारीरिक दृष्ट्या व मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे प्रमाणपत्र अर्ज सोबत जोडणे आवश्यक असेल.
वेतन
प्रत्येक पदानुसार वेगवेगळे वेतन देण्यात येणार आहे. कमाल 60 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे.
निवड प्रक्रिया
या भरतीप्रक्रियेसाठीची निवडप्रक्रिया ही थेट मुलाखती द्वारे केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीमधील अर्जाचा नमुना डाऊनलोड करुन तो भरावा. या पदभरतीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची पडताळणी केली जाईल त्यानंतर पात्र उमेदवाराची थेट मुलाखत पनवेल महानगरपालिका स्तरावर निवड समिती मार्फत घेण्यात येणार आहे. या भरतीप्रक्रियेच्या जाहिरातीमध्ये दिल्यानुसार गुणांकन पद्धतीने उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे.
अर्जाचे शुल्क : उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्क साठी राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्षक (डिमांड ड्राफ्ट) जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवाराकरिता 150 व राखीव प्रवर्गाकरिता 100 रुपये अर्जाचे शुल्क भरावे लागेल, हा धनाकर्ष इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेल्फेअर सोसायटी पनवेल या नावे काढावा.
मुलाखतीची तारीख आणि वेळ : वर नमूद केलेल्या सर्व पदासाठी 4 सप्टेंबर 2024 वार बुधवार रोजी मुलाखत घेतल्या जाणार आहेत ही मुलाखत 02 ते 05 या वेळेमध्ये घेतली जाणार असून या मुलाखतीसाठी कागदपत्राची तपासणी सकाळी 11 ते 01 वाजे दरम्यान घेतल्या जाईल.
मुलाखतीचे ठिकाण : पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य विभाग, देवळे तलावाच्या समोर, गोखले हॉलच्या शेजारी, पनवेल-410 201
उमेदवारासाठी सूचना