फोटो सौजन्य- iStock
HLL लाइफकेअर लिमिटेडने विविध पदांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये HLL संस्थेतील विविध पदांचा विचार केला जाणार आहे. या भरती प्रक्रियेच्या अधिसूचनेने अनेक उमेदवारांनी पाऊले उचलण्यास सुरुवातही केली आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून देशात रोजगाराची चांगली संधी निर्माण होत आहे. या संधीमार्फत अनेक जणांना HLL सारख्या नावजलेल्या कंपनीमध्ये काम करण्याची उत्तम संधी मिळणार आहे. या संधीचे सोने करण्यास सुरुवात झाली आहे. इच्छुक उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. यासाठी अर्ज करावे लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन स्वरूपात होत आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांनी HLL लाइफकेअर लिमिटेडच्या hrhincare@lifecarehll.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.
HLL लाइफकेअर लिमिटेडने विविध रिक्त जागांसाठी उमेदवारांची भरती करण्याचे योजिले आहे. या पदांमध्ये डायलिसिस टेक्नीशियन, जूनियर डायलिसिस टेक्नीशियन तसेच इतर पदांचा समावेश आहे. या पदी काम करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ७ सप्टेंबर २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुभा आहे. यानंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकर अर्ज करण्याचे निर्देश HLL लाईफकेअर लिमिटेडने दिले आहे. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांची कंपनीतील तब्बल १२१ रिक्त पदी नियुक्ती केली जाणार आहे.
या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी उमेदवारांना काही अटी शर्तींना पात्र करणे गरजेचे आहे. एकंदरीत, HLL लाइफकेअर लिमिटेडने उमेदवाराच्या वयोमर्यादेविषयी घोषणा केली आहे. उमेदवाराचे वय ३७ वर्षांच्या आत असणे बंधनकारक आहे. ३७ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या उमेदवारांना या भरती प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही आहे. या भरतीच्या मार्फत टेक्नॉलॉजी विभागामध्ये उमेदवारांना काम करता येणार आहे. डायलिसिस टेक्नीशियन तसेच ज्युनिअर डायलिसिस टेक्नीशियन पदाच्या रिक्त जागांमध्ये भरती होत असल्याने उमेदवारांना तंत्रज्ञानात ज्ञान असणे गरजेचे आहे .
HLL लाइफकेअर लिमिटेडच्या या भरती प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी अर्ज करण्याअगोदर या भरती प्रक्रियेविषयी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे. या कामांना तसेच भरती प्रक्रियेचा संपूर्ण अभ्यास करण्यासाठी उमेदवारांनी HLL लाइफकेअर लिमिटेडच्या hrhincare@lifecarehll.com या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. वॉक इन मुलाखतीद्वारे ऊमेदवाराची निवड केली जाणार आहे.