करीना कपूरचं ओटीटीत पदार्पण! मर्डर मिस्ट्रीवर आधारित ‘जाने जान’चा ट्रेलर रिलीज, जयदीप अहलावत आणि विजय वर्माही प्रमुख भूमिकेत
अभिनेत्री करीना कपूरचा नवा चित्रपट 'जाने जान' चा ट्रेलर आज रिलीज झाला आहे. या चित्रपटात करीना कपूरसोबत 'पाताळ लोक' फेम जयदीप अहलावत आणि अभिनेता विजय वर्मा मुख्य भूमिकेत आहेत. 'द डिव्होशन ऑफ सस्पेक्ट एक्स' या जपानी रहस्य कादंबरीवर आधारित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुजॉय घोष यांनी केले आहे.