दिल्ली : किंगफिशर एअरलाइन्सच्या 9000 कोटींहून अधिकच्या बँक कर्ज थकबाकीच्या प्रकरणात फरार उद्योगपती विजय मल्ल्याने न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी सुरू असलेली सुनावणी सुप्रीम कोर्टाने गुरुवारपर्यंत तहकूब केली आहे. आता या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात होणार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले(Kingfisher Airlines owes Rs 9,000 crore; Hearing schedule against Vijay Mallya).
याआधी सुप्रीम कोर्टाने 24 फेब्रुवारी रोजी सुनावणी निश्चित केली होती. यामध्ये त्यांनी फरारी मल्ल्याला वैयक्तिकरित्या किंवा त्याच्या वकिलामार्फत हजर राहण्याची शेवटची संधी दिली होती. खंडपीठाने म्हटले होते की, मल्ल्याला वैयक्तिकरित्या किंवा वकिलाद्वारे हजर राहण्याची अनेकवेळा संधी दिली आहे.
30 नोव्हेंबर 2021 च्या शेवटच्या आदेशात विशिष्ट निर्देशही दिले आहेत. न्यायालयापासून माहिती लपवून ठेवल्याच्या आरोपाखाली मल्ल्या 2017 मध्ये दोषी आढळला आहे. मल्ल्याने स्टेट बँक ऑफ इंडिया आणि किंगफिशर एअरलाईन्समधील प्रकरणात संपत्तीचे संपूर्ण तपशील उघड करण्यासंदर्भातील न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याचा आरोप आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यू. यू. ललित, न्यायमूर्ती एस. रविंद्र भट आणि न्यायमूर्ती पी. एस. नरसिम्हा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यापर्यंत तहकूब केली आहे.
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]