Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर…

'मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' हा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग हा काशिनाथचे चाहते आणि समकालीन रसिकामित्र रमेश रामचंद्र भिडे सादर करीत आहेत.

  • By Sanchita Thosar
Updated On: Aug 13, 2021 | 11:12 AM
मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर…
Follow Us
Follow Us:

– संजय डहाळे

नाटकाच्या जाहिरातीत ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर !’ असं लिहिण्याची नवी प्रथा सुरू करणारा, तसंच रंगमंचावरल्या एन्ट्रीलाच हमखास शिट्टीची दाद अन् टाळ्या मिळविणारा किंवा नाट्यगृहाबाहेरला ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड बघून आत प्रवेश करणारा…

डॉ. काशिनाथ घाणेकर म्हणजे एकदम ‘कडक’ अभिनेता! मराठी रंगभूमीवरला सुपरस्टार. नाटकांपासून दूर चाललेल्या तरुण रसिकांना खेचून आणण्याची ताकद त्यांच्याकडं होती. एक कालखंड त्याच्या अस्तित्वानं अक्षरशः भारावून गेला. तेजस्वी पाणीदार निळे डोळे, गोरापान वर्ण, मनमोकळं हास्य, टाइमिंगची उत्तम जाण, अभिनयाची जबरदस्त ताकद – ही वैशिष्ट्ये असणारा हा गुणी अभिनेता. काळाच्या ओघात पडद्याआड जरी गेला असला तरीही त्याच्या रंगमंचावरल्या आठवणी, किस्से त्याने केलेल्या एकापेक्षा एक सरस भूमिका, नाटक – चित्रपट आणि वैयक्तिक जीवनातील घटना, त्याच्या भोवतीचे वाद-विवाद, समज-गैरसमज हे सारं काही आजही मराठी रसिकांच्या मनात घर करून बसलंय.

‘मी आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा हृदयस्पर्शी एकपात्री प्रयोग हा काशिनाथचे चाहते आणि समकालीन रसिकामित्र रमेश रामचंद्र भिडे सादर करीत आहेत. कोरोनीपूर्वी याचे चार प्रयोग बालगंधर्व पुणे, चिंचवड मोरे सभागृह, पुण्याचे अण्णाभाऊ साठे नाट्यगृह येथे झाले. कोरोना काळातही डोंबिवलीत निमंत्रित रसिकांसाठी दोन प्रयोग पेश करून त्यांनी बाजी मारली!

नाटककार वसंत कानेटकरांची इतिहास जागा करणारी दोन नाटकं. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ आणि ‘इथे ओशाळला मृत्यू’ या दोन्हीत डॉक्टरांनी उभा केलेला संभाजीराजे थरकाप उडविणारे होता. संभाजी राजे म्हणजे डॉक्टर असं समीकरणच बनलं गेलं. गेटअप पासून ते सादरीकरणापर्यंत डॉक्टर दक्ष असायचे. पु. ल. देशपांडे यांच्या ‘तुझं आहे तुझ्यापाशी’ यातला श्याम ही ते ताकदीने रंगवीत. श्री. ना. पेंडसे यांचे ‘गारंबीचा बापू’ हे कोकणाच्या पार्श्वभूमीवरलं नाट्य. गारंबी गावचा बापूमध्ये ते पुरते रममाण व्हायचे. वसंत कानेटकरांचे ‘अश्रूंची झाली फुले’ यातला कॉलेजकुमार लाल्या. ज्येष्ठ रंगधर्मी प्रभाकर पणशीकर यांच्या समक्ष असणारे प्रसंग थक्क करून सोडणारे. काही प्रसंगाच्या आठवणींनी आजही अंगावर काटा उभा राहतो. शं. ना. नवरे यांचं ‘गुंतता हृदय हे’मधला बाबूल. आशा काळे (महानंदा) आशालता (कल्याणी) यांच्यासोबत चांगलं ट्युनिंग जमलं होतं. यालाही कोकणाचीच पार्श्वभूमी होती. तरुण आणि प्रौढ बाबुल या दोघांतला फरक ते अभिनय व देहबोलीतून नेमकेपणानं पेश केली होती. ‘आनंदी गोपाळ’, ‘मधुमंजिरी’ याही नाटकांतून डॉक्टरांनी आपल्या अभिनयातली ‘डॉक्टरी’ सिद्ध केली होती. भूतकाळातील नाटकं आणि भूमिकांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं उजाळा मिळाला.

डॉक्टरांचा जीवनप्रवास एका मध्यंतरासह दोन अडीच तास रंगतदार करण्यात रमेश भिडे यांचं कौशल्य आहे. एकेक आठवणींना ते उजाळा देतात. विशेषतः संभाजीराजांची स्वगतं जी डॉक्टरांनी केली. त्याचंही सादरीकरण करून थक्क करून सोडतात. एका कलाकाराच्या येवढ्या घटनांचे साक्षीदार होण्याचं भाग्य मिळतं. जे आनंददायी आहे.

नाटकांप्रमाणे डॉक्टर हे चित्रपटांतही पोहचले खरे, पण ते रमले नाटकातच. १९५२ ते १९७६ या दरम्यान त्यांनी पंधरा एक चित्रपटांत भूमिका केल्या. त्यांचा पहिला चित्रपट ‘लक्ष्मी आली घरा’ तर १९७६ साली प्रदर्शित झालेला ‘हा खेळ सावल्यांचा’ हा गाजलेला अखेरचा चित्रपट. ‘पाठलाग’, ‘मराठा तितुका मेळवावा’, ‘मधुचंद्र’, ‘एकटी’, ‘प्रीत शिकवा मला’, ‘अभिलाषा’, ‘देवमाणूस’, ‘गारंबीचा बापू’, ‘मानला तर देव’, ‘अजब तुझे सरकार’, ‘झेप’ असे चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ज्यावेळी सिनेसृष्टीत राजेश खन्ना सुपरस्टार म्हणून गाजत होता. त्याचवेळी डॉक्टर हे रंगभूमीवरले सुपरस्टार ठरले! डॉक्टरांच्या जीवनावर चित्रपटही निघाला. हे भाग्य कलाकाराच्या नशिबी दुर्मिळच म्हणावं लागेल. अर्थात चित्रपट आणि सत्य यात तफावत असल्याचेही बोललं जातं. या कार्यक्रमात चित्रपट कामगिरीवर भाष्य नाही, तर नाटकांवर, त्यातील स्वगतांवर, त्यातील भुमिकांवर तपशीलवार निवेदन आहे.

रमेश भिडे हे स्वतः उत्तम नट आहेत. अनेक नाटकांतील स्वगतं त्यांची पाठ आहेत. त्यातील बारकावेही तपशीलासह त्यांना ठाऊक आहेत. केवळ रंगमंचावर त्यांचा आजवरचा वावर नाही तर पडद्यामागील हालचालीही त्यांना माहीत असतात. संवाद कौशल्य तर त्यांची जमेची बाजूच. याचा परिणाम म्हणजे हा कार्यक्रम एका उंचीवर जाण्यास मदतच होते. दोन तासांवर चालणारा हा एकपात्री कुठेही कंटाळवाणा न होता तो उत्कंठा वाढविणारा होतो. प्रत्येकाशी ते ‘संवाद’ साधत असल्याचा भास होतो. हे विशेष!

ज्येष्ठ दिग्दर्शक मा. दत्ताराम यांनी डॉक्टरांना संभाजीच्या भूमिकेसाठी दिलेली शाब्बासकी किंवा डॉक्टरांचे गुरुवर्य रामचंद्र वर्दे यांनी यशस्वी अभिनेत्याची कथन केलेली सूत्रं किंवा रसिकांच्या मिळालेला उदंड प्रतिसादावर डॉक्टरांचं भाष्य – असे अनेक घटनांवर गुंतून ठेवत सहजतेनं हा एकपात्री बहारदार होतो.

मराठी रंगभूमीवर भूमिका करणाऱ्या नव्या पिढीच्या कलाकारांना, तंत्रज्ञांना, निर्मात्यांना, दिग्दर्शकांना या कार्यक्रमातून निश्चितच काही ‘टिप्स’ मिळतात. ‘डॉक्टर घाणेकर’ हा कार्यक्रम फक्त एका व्यक्तिरेखेपुरता मर्यादित न राहता उभ्या नाट्यसृष्टीवर तटस्थपणे काही सांगू पाहतो. मराठी रंगभूमीवर अशा प्रकारचे एकपात्री विरळच आहेत. त्यात रमेश भिडे यांनी कमाल केली आहे!

डॉक्टरांची एक्झीट झाली त्याला आता ३९ वर्षे होतील. येवढा काळ बदलला. एक पिढी बदलली, पण आजचा तरुणही डॉक्टरांबद्दल कुतूहल बाळगून आहे. तरुणांना कुठेतरी त्यांच्या मनातला ‘लाल्या’ हा डॉक्टरांमध्ये दिसत असावा. पुल देशपांडे एकदा म्हणाले होते, ‘पूर्ण कपाळमोक्ष झाला तरी काशिनाथ कधीही कुठेही थांबणार नाही. झोकून देणं हा त्यांचा स्वभावच. त्यांचं पूर्ण जगणं म्हणजेच मनस्वी व्यक्तिमत्त्वच!’ हेच खरं!

Web Title: Know about dr kashinath ghanekar nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2021 | 11:12 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.