Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेम सिद्धीस जाऊ दे….. 600 वर्षापूर्वीची कथा असलेल्या प्रेममंदिरात मजनू आणि प्रेमपुजारी करतात प्रार्थना

आशिक म्हणजे प्रेमाचा अनुरोध करणारा. केन नदी काठी भरणारा हा मेळा भूरागड किल्ल्याजवळ असलेल्या एका मंदिरात भरतो. प्रेमासाठी बलिदान केलेल्या प्रेमी जीवांची पार्श्वभूमी या मागे आहे. प्रेमासाठी प्राणार्पण केलेला नट महाबली बीतन याची ही कथा. त्याचे येथे मंदिर बांधले गेले असून त्याला प्रेम का मंदिर असेच नाव आहे.

  • By Vanita Kamble
Updated On: Mar 04, 2021 | 08:30 AM
Let love be fulfilled ..... Majnu and Prempujari pray in the temple of love which has a story of 600 years ago

Let love be fulfilled ..... Majnu and Prempujari pray in the temple of love which has a story of 600 years ago

Follow Us
Follow Us:

बांदा : भारत विविध संस्कृती आणि चालीरितीनी परिपूर्ण देश आहे. सध्याचे दिवस यात्रा जत्रांचे दिवस असून देशात विविध ठिकाणी विविध प्रकारच्या जत्रा, यात्रा आणि मेळा भरू लागले आहेत, उत्तरप्रदेशातील बांदा जिल्ह्यतील भूरागड येथे दर मकरसंक्रांतीच्या काळात एक विशेष मेळा भरतो आणि त्याला मजनूंचा मेळा म्हटले जाते.

आशिक म्हणजे प्रेमाचा अनुरोध करणारा. केन नदी काठी भरणारा हा मेळा भूरागड किल्ल्याजवळ असलेल्या एका मंदिरात भरतो. प्रेमासाठी बलिदान केलेल्या प्रेमी जीवांची पार्श्वभूमी या मागे आहे. प्रेमासाठी प्राणार्पण केलेला नट महाबली बीतन याची ही कथा. त्याचे येथे मंदिर बांधले गेले असून त्याला प्रेम का मंदिर असेच नाव आहे.

दरवर्षी लाखोंच्या संखेने येथे प्रेमपुजारी येतात, प्रेमाच्या या देवाला खिचडीचा नैवैद्य अर्पण करतात आणि आपले प्रेम सिद्धीस जाऊदे अशी प्रार्थना करतात.

यामागची कथा अशी की 600 वर्षापूर्वी महोबाचा अर्जुनसिंग या भूरागडचा किल्लेदार होता. मध्यप्रदेशातील सरबई गावातील एक नट या किल्ल्यात नोकरीसाठी आला. या प्रदेशाच्या राजाची कन्या त्याच्या प्रेमात पडली. राजाला जेव्हा राजकन्या त्याचा प्रेमात पडल्याचे समजले तेव्हा त्याने बीतनला एक अट घातली.

भूरागड समोर नदीपलीकडे असलेल्या बाम्बेश्वर किल्ल्यापासून बीतनने कच्चा दोर या किल्लावर बांधायचा आणि त्या दोरावरून चालत यायचे. कच्चा दोर बांधला गेला आणि बीतनची पावले दोरावरून चालू लागली. तेव्हा राजाने एका बाजूने हा दोर कापून टाकला. बीतन उंचावरून खाली कोसळून मरण पावला आणि किल्ल्याच्या खिडकीतून हे दृश्य पाहत असलेल्या राजकन्येने त्याच्या प्रेमाला जागून खिडकीतून खाली उडी मारून जीव दिला. तेथे या दोघा प्रेमींची समाधी बांधली गेली त्यालाच प्रेम का मंदिर म्हणतात.

[read_also content=”पायलटच्या केबिनमध्ये घुसले मांजर… अथक प्रयत्न करुनही मांजर हाती न लागल्याने विमानात हलकल्लोळ https://www.navarashtra.com/latest-news/a-cat-enters-the-pilots-cabin-nrvk-96808.html”]

Web Title: Let love be fulfilled majnu and prempujari pray in the temple of love which has a story of 600 years ago nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2021 | 08:30 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.