अमरावती (Amravati). पावसाळ्यात (the rainy season) घरात साप निघणे (snakes) ही बाब सामान्य असू शकते. पण अमरावती जिल्ह्यातील उत्तमसरा (Uttamsara in Amravati district) येथे एका घरात तब्बल २२ कोब्रा (cobra cubs) जातीच्या सापाचे पिल्लू आढलेत. दिवसभर रेस्क्यू ऑपरेशननंतर (rescue operation) हे सगळे साप पोहरा जंगलात (the Pohra forest) सोडण्यात आले. उत्तमसरा येथील मंगेश सायंके (Mangesh Sayanke) हे कुटुंबासह काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. गुरुवारी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ त्यांना सापाची कात आढळली. त्याकडे दुर्लक्ष करीत ते दैनिक कार्यात मग्न झाले.
[read_also content=”साथ जियेंगे, साथ मरेंगे! प्रेमी जोडप्याचे मृतदेह जंगलात कुजलेल्या अवस्थेत आढळले, घरच्यांकडून होता विवाहाला विरोध https://www.navarashtra.com/latest-news/live-together-die-together-the-bodies-of-the-loving-couple-were-found-rotting-in-the-forest-the-family-opposed-the-marriage-nrat-163084.html”]
सायंकाळी अंथरूण टाकत असताना त्यामधून साप निघाला. मंगेश तात्काळ वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांना तातडीने कळविले. भूषण सायंके यांनी सुरुवातीला छोटा नाग पकडला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरातील तुराटीच्या कुडावर नागाची आणखी दोन पिले दिसली. त्यामुळे संपूर्ण तुरट्यांचे कूपंनच काढण्यात आले. दिवसभराच्या शोधकार्यात कोब्रा नागाची एकूण २२ पिले आढळली. भूषण सायंके, पंकज मालवे यांनी या सापांची वनविभागात नोंद केली व जवळच्या पोहरा येथील नैसर्गीक अधिवासात सोडले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
सापाच्या तब्बल बावीस पिलांचं रेस्क्यू….
उत्तमसरा येथील मंगेश सायंके हे कुटुंबासह काही दिवसांकरिता बाहेरगावी गेले होते. त्यानंतर घरी परतल्यावर घराच्या अनेक भागात कोब्रा जातीच्या सापाचे अनेक पिल्लं आढळल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली मात्र घरातली नागरिकांनी प्रसंगावधान राखून सर्पमित्र व वसा संस्थेचे भूषण सायंके यांनी 22 सापांच्या पिल्लांचे रेस्क्यू केलं व या नंतर या सर्व पिल्लांना पोहरा जंगलात सोडण्यात आले. यावेळी वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.
दिवसभर चालले सापांच्या पिल्लांचे रेस्क्यू…..
सायंके कुटुंब गुरुवारी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दाराजवळ त्यांना सापाची कात आढळली. त्याकडे दुर्लक्ष करीत ते दैनिक कार्यात मग्न झाले. मात्र सायंकाळी अंथरूण टाकत असताना त्यामधून क्रोबा नागाचे पिल्लू बाहेर पडले असता मंदा सायंके यांनी लगेच घरातील मुलांना घराबाहेर काढले व वसा संस्थेचे ॲनिमल्स रेस्क्यूअर भूषण सायंके यांना तातडीने कळविले. भूषण सायंके यांनी हा छोटा नाग पकडला. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वयंपाकघरातील तुराटीच्या कुडावर नागाची आणखी दोन पिले दृष्टीस पडली. त्यामुळे संपूर्ण कुडच काढण्यात आला. दिवसभराच्या शोधकार्यात कोब्रा नागाची एकूण २२ पिले काढून त्यांना जारमध्ये बंद केले.
उत्तमसरा गावात भीतीचे वातावरण….
उत्तमसरा गावातील सायंके कुटूंबियांच्या घरात 22 कोब्रा जातीच्या सापांचे पिल्लं आढळल्याने संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यामुळे एकाच घरात 22 कोब्रा जातीचे पिल्लं आढळल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे गावात कुठेही साप निदर्शनास आल्यास सर्पमित्रांना काळविण्याचे आवहान सर्पमित्रांनी केले आहे.