मुंबई : मुंबई ते अहमदाबाद अंतर कमी करण्यासाठी सुरू असलेल्या बुलेट ट्रेन प्रकल्पामध्ये नवे विघ्न उभे झाले आहे. जमीन अधिग्रहण आणि पर्यावरणासंदर्भातील चिंता मिटल्यानंतर आता आयकरच्या मुद्याने मूळ धरले आहे. या प्रकल्पात कार्यरत अभियंत्यांच्या उत्पन्नावर आकारण्यात येणाऱ्या आयकरावर जपानने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत( Major disruption in PM Modi’s dream bullet train project; Japan’s question on income tax recovery).
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे डिझाईन करीत असलेल्या सल्लागारांवर हा कर आकारण्यात येऊ नये, असे जपानचे मत आहे. प्राप्त माहितीनुसार, या सल्लागारांना मिळणारी फी आणि अन्य खर्चांवर कर आकारू नये अशी मागणी करतानाच जपानने या प्रकल्पास होत असलेल्या विलंबावरूनही इशारा दिला आहे. या प्रकल्पाला जपान सरकारकडून हमी देण्यात आली आहे.
2022 मध्ये पारित झालेल्या अर्थ विधेयकात आयकर सवलत मागे घेण्यात आली असून नव्या नियमानुसार सल्लागारांनाही विद्यमान आर्थिक वर्षापासून कर द्यावा लागणार आहे. या कंपन्यांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना करात सवलत देण्याची मागणी जपान सरकारने केली आहे.
जपान सरकारने भारत सरकारच्या आयकर कलम 8, 8ए, 8बी आणि कलम 10 मधील 9 व्या कलमावर आक्षेप नोंदविला आहे. एवढेच नव्हे तर भारता कार्यरत विदेशी नागिरकांच्या उत्पन्नावरही आयकर तरतुदीबाबत मत व्यक्त केले आहे. या प्रकल्पासाठी भारत सरकारला जपान सरकारने कर्जपुरवठाही केला आहे. यापूर्वी या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण समस्या ठरली होती. त्यानंतर सरकारच्या अथक प्रयत्नांती आता हा प्रकल्प मार्गी लागला आहे.
[read_also content=”घरात-दुकानात, वाहनांना ‘लिंबू-मिरची’च का बांधतात? अध्यात्म आणि विज्ञान काय सांगते? https://www.navarashtra.com/religion/religion/nimbu-mirchi-totka-nrvk-257586.html”]
[read_also content=”येथे लग्नानंतर नविन नवरा-नवरीच्या प्रायव्हेट पार्टची पूजा करतात; पूजेच्या नावावर होतात वधू-वरावर अत्याचार https://www.navarashtra.com/viral/here-after-the-wedding-the-newlyweds-worship-the-private-part-of-the-bride-the-bride-and-groom-are-tortured-in-the-name-of-worship-256616.html”]
[read_also content=”रशिया-युक्रेननंतर आता जपानमध्ये घडला गूड प्रकार; 1000 वर्षांपासून दगडात कैद असलेला राक्षस आला बाहेर https://www.navarashtra.com/latest-news/japans-killing-stone-cracked-nrvk-251491.html”]
[read_also content=”एकदम भयानक डिश! नाव ऐकून पण अंगावर काटा येईल; विंचू आणि सापाचे सूप https://www.navarashtra.com/viral/scorpion-and-snake-soup-famous-in-china-nrvk-241966.html”]
[read_also content=”भारतात सर्वात प्रथम ‘या’ गावावर पडतात पहिली सूर्यकिरणे! पहाटे 3 वाजता डोंगरावर सूर्य उगवतो; दुपारी चार वाजताच पडतो अंधार https://www.navarashtra.com/travel/travel/dong-valley-the-land-of-indias-first-sunlight-nrvk-248724.html”]
[read_also content=”हिंदू धर्मीय 33 कोटी देवतांना मानतात; पण हिंदूंना सर्वाधिक आवडणारा देव कोणता? कोणत्या देवावर आहे जास्त श्रद्धा? https://www.navarashtra.com/latest-news/hindus-worship-33-crore-deities-but-what-is-the-favorite-deity-of-hindus-which-god-do-you-have-more-faith-in-248711.html”]
[read_also content=”घरातील एक वास्तू दोष संपूर्ण कुटुंबाला बर्बाद करु शकतो; शेकडो वास्तू दोषांवर एकच जालीम उपाय https://www.navarashtra.com/latest-news/an-architectural-defect-in-a-home-can-ruin-an-entire-family-a-single-solution-to-hundreds-of-architectural-defects-nrvk-247553.html”]