
सोलापूर : सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे तीन दिवसांपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. दोन दिवस ग्रामीण भागाचा आढावा घेतल्यानंतर शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. मात्र या बैठकीवर आंदोलनाचे सावट दिसून आले.
दरम्यान, प्रणिती शिंदे यांची सोलापूरच्या पालकमंत्रीपदावर नियुक्ती करावी, अशी अजब मागणी भाजपने केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील हे पालकमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी काळे कपडे, काळी टोपी परिधान करून नियोजन भवन येथे आले होते. तर काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपच्या नगरसेवकाने केली.
[read_also content=”राज्यात पुढील ४ दिवस पावसाचा इशारा; मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांचा कडकडाट होणार https://www.navarashtra.com/latest-news/rain-warning-for-next-4-days-in-the-state-there-will-be-lightning-in-central-maharashtra-and-marathwada-nrdm-120092.html”]
सोलापुरात बाधित रुग्णांची संख्या वाढत असताना औषधांचा तुटवडा आहे. मात्र, पुण्यात सर्व औषधे मिळतात. सोलापूरसाठी आतापर्यंत तीन पालकमंत्री नियुक्त करण्यात आले. मात्र हे सर्व पालकमंत्री बिनकामाचे असून सोलापुरातील आमदारांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात यावी, सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नियुक्ती पालकमंत्री म्हणून करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली.