Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी गाण्याचा विक्रम : ‘येड्यावानी करतंय’ गाण्याच्या टिमला करावी लागली चित्रीकरणादरम्यान पावसामध्ये येड्यावानी नॉनस्टॉप ३६ तास मेहनत

ह्या गाण्याचं चित्रीकरण इगतपुरी (Igatpuri) जवळच्या एका गावात केलंय. पहिल्या प्रेमावरचं गावरान गाणं असल्याने हिरव्याकंच शेतामध्ये पावसाळ्यात हे गाणं चित्रीत करायचं ठरलं, पण पावसानेच शुटिंगमध्ये खोळंबा केला आणि ३६ तास ब्रेक न घेता टिमला हे गाणं शुट करावं लागलं.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 29, 2021 | 04:13 PM
मराठी गाण्याचा विक्रम : ‘येड्यावानी करतंय’ गाण्याच्या टिमला करावी लागली चित्रीकरणादरम्यान पावसामध्ये येड्यावानी नॉनस्टॉप ३६ तास मेहनत
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : गाण्यामध्ये रोमान्स (Romance) फुलवायचं काम करणारा पाऊस (Rain) त्याचं गाण्याच्या शुटिंगच्या (Song Shooting) टिमला मात्र किती त्रासदायक ठरू शकतो, त्याचं उत्तम उदाहरण ठरलं, नादखुळा म्युझिकचं (Nadkhula Music) ‘येड्यावानी करतंय’ (Yedyavani Kartay) हे नुकतंच रिलीज झालेलं गाणं (Song). नादखुळा म्युझिक प्रस्तुत ‘येड्यावानी करतंय’ हे गावरान बाजाचं रोमँटिक गाणं नुकतंच रिलीज झालंय.

निखील नमीत आणि प्रशांत नाकतीची निर्मिती असलेलं, अभिजीत दानी दिग्दर्शित, संजु राठोड आणि जी स्पार्क (G Spark) ह्यांनी संगीतबध्द केलेलं, संजु राठोड आणि सोनाली सोनावणेने गायलेलं ‘येड्यावानी करतंय’ हे गाणं श्रध्दा पवार आणि नील चव्हाणवर चित्रीत झालंय. ह्या गाण्याचं चित्रीकरण इगतपुरी (Igatpuri) जवळच्या एका गावात केलंय. पहिल्या प्रेमावरचं गावरान गाणं असल्याने हिरव्याकंच शेतामध्ये पावसाळ्यात हे गाणं चित्रीत करायचं ठरलं, पण पावसानेच शुटिंगमध्ये खोळंबा केला आणि ३६ तास ब्रेक न घेता टिमला हे गाणं शुट करावं लागलं.

[read_also content=”कार्तिकी गायकवाड आणि आदर्श शिंदे पहिल्यांदाच आले एकत्र ‘सपान लागलं’ साठी! https://www.navarashtra.com/latest-news/karthiki-gaikwad-and-adarsh-shinde-came-together-for-the-first-time-for-sapan-lagala-nrvb-186469.html”]

ह्याविषयी दिग्दर्शक अभिजीत दानी म्हणतात,”नवोदित कलाकारांची टिम असल्याने रिटेक झाले तर, असं म्हणून शुटिंग वेळेत पूर्ण करण्यासाठी सकाळी चारची शिफ्ट लावली. पण जणु पावसाने आमची परिक्षाच घ्यायचं ठरवलं होतं. पावसाने त्यादिवशी उसंतच घेतली नाही. मग उघड्या रानात शुटिंग पूर्ण करताना आमचे नाकीनऊ आले. अख्खा दिवस अख्खी रात्र जागून आणि दुस-या दिवशीही असं करून ३६ तासात गाणं पूर्ण केलं. ह्यात आमच्या युवा कलाकारांचा जोश कामी आला. आणि आता ही येड्यावानी केलेली मेहनत फळाला आलेली आहे.”

Our most awaited Romantic song "Yedyavani Kartay" is streaming now only on #NaadkhulaMusic youtube channel. Don't forget to subscribe our channel. Link – https://t.co/2VPv0GBdiw#YedyavaniKartay #SongOutNow #RomanticSong #MarathiSong #NikhilNamit #PrashantNakti #SanjuRathod — Naadkhula Music (@Naadkhulamusic) September 29, 2021

निर्माते निखील नमीत आणि प्रशांत नाकती म्हणतात, “नादखुळा म्युझिक सुरू करताना नव्या टॅलेंटला व्यासपीठ देण्याचा आमचा संकल्प होता. संजू राठोड ह्या जळगावच्या टॅलेंटेड संगीतकार, गायकाला आम्ही ह्या गाण्यातून संधी दिलीय. अशाच नवनव्या कलाकारांना आपली क्षमता सिध्द करायची संधी नादखुळा म्युझिक सातत्याने देत राहिल.”

संजु राठोडने गाण्याचे बोल लिहीले आहेत. संगीत दिले आणि हे गाणे गायलेही आहे. गीतकार, संगीतकार, गायक संजु राठोड म्हणतो, “माझी आत्तापर्यंतची सर्व गाणी ही शहरी बाजाची होती. गावरान बाजाचं एखादं गाणं करावं अशी इच्छा होती. आणि हे बोल सुचले. गाणं तयार झाल्यावर एकदा प्रशांतदादाला ऐकवलं. त्याला ते एवढं आवडलं की, प्रशांतदादा आणि निखीलदादाने लगेच निर्मिती करायचं ठरवलं. शुटिंगपूर्वी हे मुलाच्याच अँगलचे गाणे होते. पण शुटिंग दरम्यान त्यात मुलीच्या भावनाही प्रकट झाल्या पाहिजेत, हे लक्षात आल्याने लगेच गाण्यात बदल केले आणि सोनाली सोनावणेला अप्रोच केला.”

गायिका सोनाली सोनावणेने गायलेलं गाणं श्रध्दा पवारवर चित्रीत झालंय. श्रध्दा आणि सोनालीचं हे एकत्र पाचवं गाणं आहे. सोनाली सोनावणे म्हणते, “माझा आवाज श्रध्दावर ऑनस्क्रीन चांगला सूट होतो असं मला वाटतं. ह्या प्रोफेशनल जर्नीमधून मला श्रध्दा ही एक बेस्ट फ्रेंड मिळाली. मी गायलेल्या गाण्यावर जेव्हा ती एक्टिंग करते, तेव्हा मला खूप आनंद होतो. श्रध्दाच्या चेह-यातली निरागसता ह्या गाण्यातून उत्तमरितीने झळकलीय. संजु राठोडसाठी मी ह्याअगोदरही तीन गाणी गायली आहेत. हे गाणं संजु ने ऐकवताच मला ते खूप आवडलं होतं. आत्तापर्यंत संजूने संगीतबध्द केलेल्या सर्व गाण्यांमधलं माझं हे सर्वात आवडतं गाणं आहे. संजूच्या गाण्याची खासियत आहे की त्याची गाणी ही युवा पिढीला खूप रिलेटेबेल असतात.”

[read_also content=”पॉर्नस्टारचा विचित्र रेकॉर्ड, एका दिवसात तब्बल ३०० पुरुषांसोबत संबंध ठेवल्याचा खुलासा https://www.navarashtra.com/latest-news/adult-film-actress-jasminstclaire-done-strange-record-of-300-relations-in-a-day-nrsr-185947.html”]

श्रध्दा पवारची सोशल मीडियावर चांगलीच फॉलोविंग आहे. श्रध्दा म्हणते, “येड्यावानी करतंय हे गाणं माझ्यासाठी खूप खास होतं. एक तर,हे माझं पहिलं गाणं, त्यात प्रचंड पावसात शुटिंग करताना चेह-यावर रोमँटिक भाव द्यायचे, हे अवघडच काम होतं. इन्स्टाग्राम इन्फ्लुएन्सर म्हणुन मोबाईल कॅमेरा फेस करणं आणि शुटिंगचा कॅमेरा फेस करणं ह्या दोन वेगळ्या गोष्टी असतात. मला अभिनेत्री म्हणून करीयर सुरू करण्याचा कॉन्फिडन्स ह्या गाण्याने दिला.”

अभिनेता नील चव्हाणचेही हे पहिलेच गाणे आहे. नील म्हणतो, “माझ्या पहिल्या सीनच्या वेळी मी खूपच नर्व्हस होतो. शुटिंग पाहायला खूप गर्दी झाली होती. मी हिरोईनला पाहून शेताच्या बांधावरून पळत चाललेला असतो असा सीन होता. तेव्हा खूप पाऊस पडत होता. शेतीच्या बांधावर खूप चिखल झाला होता. त्यामुळे घसरून पडायची शक्यता होती. पण न घसरता चेह-यावर हसरे एक्सप्रेस घेऊन पळत जायचे होते. हा माझा सगळ्यात अवघड सीन होता. अनेक अडचणींना सामोरे जाऊन आम्ही गाणे पूर्ण केले आणि आता हे गाणे रिलीज होते आहे. ह्याचा आम्हांला आनंद होतो आहे.”

Web Title: Marathi song record the team of yedyavani kartanya had to work hard for 36 hours non stop in the rain during filming nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2021 | 04:09 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.