Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तीन मुलांच्या आईसोबत जुळलं अल्पवयीन मुलाचं लग्न; लग्नाची तारीखही ठरली पण तेवढ्यात….

अल्पवयीन मुलाचं प्रेम जडलं ते वर्ध्यातल्या तीन मुलांची आई असलेल्या एका महिलेवर. नजरेच्या एका कटाक्षात मैत्री झाली, मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि प्रेमाने अंतिम निर्णय घेतला तो विवाह बंधनात अडकण्याचा मात्र....

  • By Amol Thakre
Updated On: Dec 29, 2021 | 08:48 PM
तीन मुलांच्या आईसोबत जुळलं अल्पवयीन मुलाचं लग्न; लग्नाची तारीखही ठरली पण तेवढ्यात….
Follow Us
Close
Follow Us:

अमरावती (Amravati) : जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एका गावातील मुलगा मजुरीसाठी अनेकदा वर्धा जिल्ह्यात जायचा. तिथेच या अल्पवयीन मुलाचा एका वयस्कर महिलेशी संपर्क आला. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि काही दिवसातच मैत्रीचे रूपांतर हे प्रेमात झालं. सदर महिलेने या अल्पवयीन मुलाला आपण विवाहित असून तीन लहान मुलाची आई असल्याची माहिती सुद्धा दिली. मात्र आकर्षणाच्या ओघात वाहत असलेल्या अल्पवयीन मुलाच्या आणि वयस्कर महिलेच्या प्रेमाच्या गाठी भेटी सुरु झाल्यात. गावात यांच्या प्रेमप्रकरणाच्या बऱ्याच चर्चा झाल्या. मात्र या दोघांनी विवाह बंधनात अडकण्याचा ठामपणे निर्णय घेतला.

[read_also content=”अमरावती/ जिवंत विद्युत वाहिनीला लोखंडी शिडीचा स्पर्श झाला, विजेच्या धक्क्याने चौघांचा जागीच मृत्यू https://www.navarashtra.com/amravati/iron-ladder-touches-live-power-line-four-die-on-the-spot-due-to-electric-shock-nrat-216408.html”]

दि. 27 डिसेंबर विवाहाचा मुहूर्त ठरला. लग्नाची तयारी सुरु झाली. अल्पवयीन मुलगा आणि तीन मुलांच्या आईच्या विवाहाची चर्चा गावात वार्‍यासारखी पसरली. घटनेची माहिती बाल संरक्षण कक्ष व पोलिसांना मिळाल्याने हा विवाह थांबवण्यासाठी प्रयत्न सुरु झाला. विवाहाची तयारी अंतिम टप्प्यात आली असतानाच बाल संरक्षण कक्ष, जातपंचायत आणि पोलीस विभागाच्या सहकार्यातून हा विवाह थांबवण्यात आला. मात्र यामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाल्याची माहिती तळेगाव दशासर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजय ठाकरे यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देताना बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी अजय डबले म्हणाले की, “एका वयस्कर महिलेचा एका अल्पवयीन मुलासोबत विवाह होणार होता. संबंधित ठिकाणी पोहोचून तेथील कुटुंबीयांना सदर बाब कायद्याने गुन्हा आहे हे सांगितले तसेच गावातील ग्रामसभेत अशा प्रकारच्या घटना गावात होता कामा नये. ग्राम बाल संरक्षण समितीने जागरुक राहून काम करावे, याबद्दल सीमा भाकरे यांनी मार्गदर्शन केले.

सदर दोन्ही कार्यवाही सुनील शिंगणे, विभागीय उपआयुक्त, महिला व बाल विकास अमरावती विभाग अमरावती व डॉ. उमेश टेकाळे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, अमरावती यांनी केली.

Web Title: Marriage of a minor child to a mother of three the date was fixed but at that time nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2021 | 08:48 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.