
haffkine institute
मुंबई : प्रशासकीय मान्यता न घेताच ४१ कोटींच्या देयकांना मान्यता दिल्याप्रकरणी हाफकिन(Haffkine) बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाला वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाकडून चांगलेच धारेवर धरण्यात आले आहे.
ही देयके मंजूर करताना सरकारला कोणत्याही प्रकारची कल्पना न दिल्याप्रकरणी तसेच २०१९-२० मधील खरेदी कक्षाकडे आलेल्या पुरवठा आदेशाप्रमाणे खरेदी केलेल्या औषधांमध्ये तफावत दिसून येत असल्याचे सांगत वैद्यकीय शिक्षण विभागाने हाफकिन(Haffkine) बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
[read_also content=”त्या बाईने चक्क साखर घातलेलं गरम पाणी नवऱ्याच्या अंगावल ओतलं, पुढे काय झालं ते तुम्हीच बघा https://www.navarashtra.com/latest-news/wife-thrown-hot-sugar-water-on-sleeping-husband-to-kill-him-nrsr-143721.html”]
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयांसाठीची औषधांची खरेदी करण्याची जबाबदारी हाफकिन बायो फार्मास्युटिकलच्या खरेदी कक्षाकडे आहे. मात्र खरेदी कक्षाकडून दरवर्षी औषध खरेदीसाठी होत असलेल्या दिरंगाईचा फटका रुग्णांना बसत आहे. त्यातच २०१९-२०या आर्थिक वर्षातील औषध खरेदीसंदर्भात खरेदी कक्षाकडून ७६.२१ कोटींची औषधे आणि त्यासंदर्भातील बाबींच्या देयकांना मान्यता देण्याची तसेच ७२.५७ कोटीच्या रकमेबाबत निर्णय घेण्यासंदर्भात विनंती करणारे पत्र खरेदी कक्षाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला पाठवले होते. मात्र यासंदर्भात निर्णय घेण्यापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून २०१८-१९, २०१९-२० आणि२०२०-२१ मधील औषध खरेदीच्या देयकांसंदर्भात खरेदी कक्षाला धारेवर धरत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.
[blockquote content=”४१ कोटींची औषध खरेदी करण्यासंदर्भात वैद्यकीय शिक्षण संचालकांचेच पत्र होते. प्रमाण अंतराच्या अधीन राहूनच संचालकांनी औषध खरेदीची परवानगी दिली होती. ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. अनेकदा बजेटमध्ये पैसे येणार असल्याने आपण त्यापूर्वी खरेदी करतो. त्यानंतर देयके सादर केली जातात. त्याचप्रमाणे ही खरेदी झाली आहे. ” pic=”” name=”- डॉ. संदीप राठोड, संचालक, हाफकिन जीव औषध निर्माण महामंडळ “]
यामध्ये २०१८-१९ या आर्थिक वर्षामध्ये ९३ कोटी रकमेच्या पुरवठा आदेश असतानाही खरेदी कक्षाकडून प्रत्यक्षात ८४ कोटींचा पुरवठा करण्यात आला होता. उर्वरित ९ कोटीसंदर्भात कोणती कार्यवाही करण्यात आली. त्याचप्रमाणे २०१९-२० मध्ये प्रशासकीय मान्यता नसतानाही ४१ कोटींची देयके कशी मंजूर करण्यात आली. याबाबत स्पष्टीकरण देण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षण विभागाकडून करताच २०१९-२० मध्ये ११२.३१ कोटींपैकी ११७.२५ कोटींची औषधांसदर्भात खरेदी प्रक्रियेची, निविदा प्रक्रियेची कागदपत्रे सादर करण्याचे आदेश हाफकिनच्या खरेदी कक्षाला दिले आहेत. त्याचप्रमाणे २०२०-२१ मध्ये पुरवठा झालेल्या १६.७७ कोटी औषधांचा पुरवठा कोणत्या वर्षातील पुरवठा आदेशानुसार झाला याचे स्पष्टीकरणही वैद्यकीय विभागाकडून खरेदी कक्षाकडे मागवण्यात आले आहे.