Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेहुल चोक्सीची हत्या होऊ शकते; पत्नीने व्यक्त केली भीती, गर्लफ्रेंडबाबतही केला दावा

पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिऱ्यांचा व्यावसायिक मेहुल चोक्सीला डॉमिनिकातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान त्याची पत्नी प्रिती चोक्सीने मेहुलच्या जीवाला धोका असून त्याच कधीही हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. यासोबतच तिने त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही माहिती सादर केली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीने ही माहिती दिली. 23 मे रोजी रात्री मेहुल जेवण करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परत आलेच नाहीत. मेहुल गायब झाल्यानंतर काही वेळातच एका सल्लागाराला आणि स्वयंपाकीला मेहुलला शोधायला समुद्र किनारी पाठवले होते. पण त्यांना त्याठिकाणी काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली, असे तीने सांगितले.

  • By Vanita Kamble
Updated On: Jun 03, 2021 | 07:29 AM
मेहुल चोक्सीची हत्या होऊ शकते; पत्नीने व्यक्त केली भीती, गर्लफ्रेंडबाबतही केला दावा
Follow Us
Close
Follow Us:

दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेत 13500 कोटींचा घोटाळा करून फरार झालेला हिऱ्यांचा व्यावसायिक मेहुल चोक्सीला डॉमिनिकातून भारतात आणण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. दरम्यान त्याची पत्नी प्रिती चोक्सीने मेहुलच्या जीवाला धोका असून त्याच कधीही हत्या होऊ शकते, अशी भीती व्यक्त केली. यासोबतच तिने त्याच्या गर्लफ्रेंडबाबतही माहिती सादर केली. एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तीने ही माहिती दिली. 23 मे रोजी रात्री मेहुल जेवण करण्यासाठी बाहेर पडल्यानंतर परत आलेच नाहीत. मेहुल गायब झाल्यानंतर काही वेळातच एका सल्लागाराला आणि स्वयंपाकीला मेहुलला शोधायला समुद्र किनारी पाठवले होते. पण त्यांना त्याठिकाणी काहीही पुरावा सापडला नाही. त्यामुळे पोलिसांची मदत घ्यावी लागली, असे तीने सांगितले.

बार्बराला ओळखत असल्याचा दावा

चोक्सीची मैत्रीण बार्बरा जैबरिकाबाबत जेव्हा तिला जेव्हा विचारणा केली असताना प्रितीने तिला ओळखत असल्याची माहिती दिली. गेल्याच वर्षी ऑगस्टमध्ये ती अँटिग्वाला आली होती असे सांगत आयलँडमधील घरीही आली होती, असे तीने स्पष्ट केले. दरम्यान बार्बरा जशी दिसते तशी अजिबात नाही, असेही प्रिती म्हणाली.

भारतीय नागरिक नाहीच

दरम्यान चोक्सी भारतीय नागरिक नसल्याचा दावादेखील प्रितीने केला. 2017 मध्येच अँटिग्वाचे नागरिकत्व घेतल्यानंतर भारतीय घटनेतील कलम 9 नुसार चोक्सी आता भारतीय नागरिक नसल्याचा दावा देखील तीने केला. चोक्सीसाठी अँटिग्वाच सर्वात सुरक्षित असल्याचेही ती म्हणाली.

भावाने दिली विरोधी पक्षनेत्याला लाच

दरम्यान चोक्सीचा भाऊ चेतनने डॉमिनिकात विरोधी पक्षनेते लेनक्स लिंटन यांच्यासोबत दोन तास चर्चा केल्याचे समजते. विरोधक संसदेत चोक्सीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणार असतील तर निवडणुकीत देणगी दिली जाईल अशी ऑफरच त्याने दिल्याचे समजते. एवढेच नव्हे तर चेतनने लिंटन यांना दोन लाख डॉलरची रक्कमही दिल्याचा दावा केला जात आहे.

IPS शारदा राऊत यांचे पथक डॉमिनिकात

चोक्सीला भारतात आणण्यासाठीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सीबीआय अधिकारी शारदा राऊत यांच्या नेतृत्वाखाली 6 अधिकाऱ्यांचं एक पथक सध्या डॉमिनिकामध्ये आहे. कोर्टाने चोक्सीच्या प्रत्यार्पणाला परवानगी दिली तर त्याला तत्काळ खासगी जेट विमानाने दिल्लीत आणले जाईल. दिल्लीत आणल्यानंतर अटक करुन त्याच्यावर पुढील कारवाई सुरू होईल, अशी माहिती सूत्राने दिली.

[read_also content=”बाईचं बाहेर लफड https://www.navarashtra.com/latest-news/immoral-relationships-do-not-mean-that-a-woman-is-not-a-good-mother-high-court-comment-nrvk-137069.html”]

[read_also content=”2051 पर्यंत… https://www.navarashtra.com/latest-news/after-a-few-days-man-will-not-be-able-to-live-on-earth-a-human-newborn-born-in-space-nrvk-136745.html”]

[read_also content=”डोस चुकला असता तर… https://www.navarashtra.com/latest-news/fathers-anguish-for-the-unborn-child-300-km-journey-by-bicycle-for-child-medicine-nrvk-136738.html”]

Web Title: Mehul choksi could be killed fear expressed by wife also claimed about girlfriend nrvk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2021 | 07:29 AM

Topics:  

  • Mehul Choksi

संबंधित बातम्या

मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; कॅनरा बँकेतील 55 कोटींचे फसवणूक प्रकरण
1

मेहुल चोक्सीविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट जारी; कॅनरा बँकेतील 55 कोटींचे फसवणूक प्रकरण

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला मोठा झटका; बेल्जियम न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
2

Mehul Choksi: मेहुल चोक्सीला मोठा झटका; बेल्जियम न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज

Mehul Choksi Extradition : चोक्सी भारतीय नागरिक आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न
3

Mehul Choksi Extradition : चोक्सी भारतीय नागरिक आहे का? मुंबई उच्च न्यायालयाचा ईडीला प्रश्न

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही
4

खटला मजबूत; तरीही प्रत्यार्पण सोपे नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.