युक्रेन : युक्रेन रशियामध्ये ताण वाढताना दिसत आहे. अशातच आता युक्रेनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. युक्रेनची राजधानी कीवसह अनेक शहरांमध्ये क्षेपणास्त्रांच्या आवाजासह जोरदार स्फोट ऐकू येत आहेत. या स्फोटात शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. मृतांचा अधिकृत आकडा अद्याप समोर आला नसला तरी मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनीही या घटनेला दुजोरा दिला आहे.
[read_also content=”जागतिक मंदीची चिन्हे? Facebook च्या 12000 कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या कधीही जाण्याची शक्यता https://www.navarashtra.com/world/signs-of-a-global-recession-12000-facebook-employees-may-lose-their-jobs-at-any-time-nrrd-334423.html”]
रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अनेक शहरांतील इमारतींमधून काळ्या धुराचे लोट बाहेर येताना दिसले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रशियाने युक्रेनमध्ये कहर करण्यासाठी 12 आत्मघाती इराणी ड्रोन पाठवले आहेत.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजधानी कीववर 75 क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले आहेत, त्यापैकी 41 युक्रेनच्या हवाई दलाने पाडले आहेत. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांच्या कार्यालयावरही क्षेपणास्त्रे डागण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नसला तरी. या हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे
युक्रेनची राजधानी कीवचे महापौर विटाली क्लित्स्को यांनी सांगितले की, “शेवचेन्स्कीव्हस्की” जिल्ह्यात अनेक स्फोट झाले आहेत. हा भाग राजधानी कीवच्या मध्यभागी आहे. एएफपी वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 8.15 च्या सुमारास हा स्फोट झाला. युक्रेनच्या राजधानीत हवाई हल्ल्याच्या सायरन्सचा आवाज एक तासापेक्षा जास्त काळ चालला.
[read_also content=”बांगलादेशातील हिंदू मंदिरावर हल्ला, कट्टरपंथीयांनी केली काली मातेच्या मूर्तीची मोडतोड https://www.navarashtra.com/world/bangladesh-hindu-temple-attack-334020.html”]