Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणापेक्षा प्लॅटफॉर्म सुधारण्याची गरज- परशुराम उपरकर

कोकण रेल्वे महामंडळ अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोलाड रेल्वे स्थानकापासून मदूरे रेल्वेस्थानकापर्यंत एकूण ३७ रेल्वेस्थानके असून ही रेल्वे स्थानके मुख्य मार्गापर्यंत जोडणाऱ्या पोहोच मार्गांची देखभाल व दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 07, 2024 | 04:03 PM
कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणापेक्षा प्लॅटफॉर्म सुधारण्याची गरज- परशुराम उपरकर (फोटो सौजन्य-ट्विटर)

कोकण रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणापेक्षा प्लॅटफॉर्म सुधारण्याची गरज- परशुराम उपरकर (फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us
Close
Follow Us:

रेल्वे स्टेशन विमानतळाप्रमाणे सुशोभीकरण केल्याची वा-वाह कार्यकारी अभियंता, सर्व अधिकारी, पालकमंत्री दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये ठेकेदार, अधिकारी, मंत्री हे मालामाल होत आहेत. पण जनता रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म वर पाऊसात भिजत गाड्या पकडतात हे दुदैवी आहे. रेल्वे स्टेशनच्या कामाचे उद्घाटन करताना पालकमंत्र्यांनी प्लॅटफॉर्मवर जाऊन बघावं की, त्या रेल्वे स्टेशनची काय परिस्थिती आहे. प्रवासी रेल्वेत चढताना – उतरताना प्लॅटफॉर्मचा वापर करतात. त्या प्लॅटफॉर्मवर खऱ्या अर्थाने सुशोभिकरण करण्याची गरज होती. अशी टीका माजी आ. परशुराम उपरकर यांनी केली. कणकवली येथील आपल्या संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

हे सुद्धा वाचा: “…कॉलेज बंद पाडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो!”, सिंधुदुर्गात ठाकरे शिवसेनेचे आंदोलन

रेल्वे स्टेशनचे खालच्या बाजुने सुशोभिकरण करताना रेल्वेकडून करार करुन जागा घेतली. तशीच रेल्वेकडून प्लॅटफॉर्म करण्याकरीता जागा मिळू शकते. त्याचा उपयोग खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनता, नागरिक, चाकरमानी यांना होईल. आज एवढा मोठा खर्च करुन काम मिळवले? ठेकेदाराची तुंबडी भरली. अधिकाऱ्यांना मलिदा मिळाला आणि त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री व बांधकाम मंत्री यांना झाला. बांधकाम मंत्र्यांनी आपला आणलेला कार्यकारी अभियंता यांच्या कामाचा कशा प्रकारे निकृष्ठ होतात. भुईबावडा घाटामध्ये कोसळलेली भिंत , फोंडाघाटात पडलेला खड्डा त्यानंतर मालवण रेस्ट हाऊसला पडलेला खड्डा , कणकवली रेस्ट हाऊसची काच वरुन खाली पडली . कोट्यावधी रुपये खर्च केलेलें कार्यकारी अभियंतांमुळे वाया गेले. या सगळ्या कामांची पालकमंत्री, बांधकाम रविंद्र चव्हाण पाहणी करणार का? असा सवाल माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला.

दरम्यान जनतेचे रस्ते आणि निर्माण करण्याच काम शासन करत असताना पालकमंत्री कार्यकरी अभियंतांना पाठीशी घातल आहेत. 11 कोटी रुपये रेल्वे स्टेशन दुरुस्तीसाठी आणि वाढीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दुरुस्ती साठी 23 कोटी मंजुर करण्यात आले आहेत. पालकमंत्र्यांनी कणकवली उपजिल्हा रुग्णालय बघावे , त्या रुग्णालयातून जनतेला सेवा मिळते का बघावी. आपले लाडके आमदार रेल्वे स्टेशन, एस.टी स्टॅंड पाहणी करत फिरतायेत. परंतु त्यांना कणकवलीचे रुग्णालयात रुग्णांना सेवा आणि डॉ देवू शकत नाहीत. जनतेला कोणत्या सुविधा लागणार त्या न बघता कोकण रेल्वे स्टेशनच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेत दुस-याचे बाळ आपण घेतल्यासारखे आहेत.

हे सुद्धा वाचा: नाणार पाठोपाठ आता सागवे घोडेपोईवाडीतही बॉक्साईट प्रकल्प! 5 सप्टेंबरला जनसुनावणी

भविष्यात आता रेल्वे स्टेशन सुशोभिकरण केले. त्याचा मेन्टेनन्स कोण करणार ? तुमच्याकडे निधी आहे का ? तसेच जिल्हाधिकारी कर्यालय जे 23 कोटी खर्च करुन लिफ्ट बसवून बोगस लाईट फिटींग केली आहे. त्याच्या मेन्टेनन्ससाठी जिल्हाधिका-यांकडे पैसे आहेत का ? पालकमंत्री बांधकाम मंत्री म्हणून एका कार्यकारी अभियंत्याला किती लाढवणार ? असा सवाल परशुराम उपरकर यांनी केला.

कोकण रेल्वेच्या रेल्वे स्टेशनचे सुशोभिकरण करण्यात येत आहे. मात्र या सुशोभिकरणात काही फोटो स्ट्र्रक्चर उभारण्यात आले . मात्र या कामात रेल्वेचे शिल्पकार मधु दंडवते यांचा विसर पडला आहे. त्यांची आठवण नाहीशी करण्याचा प्रयत्न पालकमंत्री व आमदारांचा आहे. असा टोला परशुराम उपरकर यांनी केला.

 

Web Title: Mla parashuram uparkar says konkan railway station need to improve platform rather than beautify it

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2024 | 04:03 PM

Topics:  

  • konkan railway

संबंधित बातम्या

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर
1

Ganpati Special Trains 2025: आनंदाची बातमी! गणेशोत्सवासाठी आणखी ४६ विशेष गाड्या धावणार, मध्य-कोकण रेल्वेने केले जाहीर

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद
2

Konkan Railway : सिंधुदुर्गात लांबच्या पल्ल्यांना थांबा मिळालाच पाहिजे; रेल्वे प्रवाशी संघटनेच्या जन आंदोलनाला उत्फुद प्रतिसाद

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?
3

Konkan News : कोकणवासियांसाठी खूशखबर, गणेशोत्सवानिमित्ताने दादर ते कुडाळ मार्गावर धावणार “शिवसेना एक्स्प्रेस”, काय आहे तिकीट दर?

Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा
4

Konkan Railway : गौरी-गणपतीसाठी रेल्वेने जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी ‘या’ रेल्वे स्थानकात विशेष सेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.