Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोरोना ड्युटीवरील २५ हजारांहून अधिक शिक्षक लसीच्या प्रतिक्षेत; फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी

कोरोनाची पहिली लाट आणि आता आलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यातील 25 हजार शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना कोविड कामाला जुंपण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय अनेक शिक्षक डॉक्टरांसोबत काम करत आहेत.

  • By Navarashtra Staff
Updated On: May 15, 2021 | 06:49 PM
कोरोना ड्युटीवरील २५ हजारांहून अधिक शिक्षक लसीच्या प्रतिक्षेत; फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून घोषित करण्याची मागणी
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई (Mumbai).  कोरोनाची पहिली लाट आणि आता आलेल्या दुसर्‍या लाटेमध्ये राज्यातील 25 हजार शिक्षकांना कोरोना ड्युटी लावली आहे. नियमांचा धाक दाखवत शिक्षकांना कोविड कामाला जुंपण्यात येत आहे. ग्रामीण भागामध्ये कोणत्याही सुरक्षेच्या साधनांशिवाय अनेक शिक्षक डॉक्टरांसोबत काम करत आहेत.

[read_also content=”नागपूर जिल्हा प्रशासनाचे हायटेक पाऊल/ औषधे आणि ऑक्सिजनची काळाबाजारी रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुरू केली अद्ययावत वेबसाईट https://www.navarashtra.com/latest-news/hi-tech-step-of-nagpur-district-administration-updated-website-launched-to-curb-blackmail-of-drugs-and-oxygen-nrat-129350.html”]

एकीकडे शिक्षकांकडून फ्रंटलाईन वर्करची कामे करवून घेत आहेत, तर दुसरीकडे त्यांना लस देण्यासाठी प्राधान्यही दिले जात नसल्याने शिक्षका मध्ये नाराजीचा सुर उमटत आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 हजारांहून अधिक कोरोना ड्युटीवरील शिक्षक लसीच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यातील कोरोनाच्या दुसर्‍या लाटेमध्ये ग्रामीण भागातील शिक्षकांना डॉक्टरांसोबत रुग्णालयात ड्युटी लावण्यात आली आहे. डॉक्टरांसह अन्य वैद्यकिय कर्मचार्‍यांना पीपीई किट उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्यासोबत काम करणार्‍या शिक्षकांना सुरक्षेची कोणतीही साधने दिली जात नाहीत. शिक्षक पीपीई किटशिवायच रुग्णालयात काम करत आहेत. ग्रामीण रुग्णालयात शिक्षकांना चतुर्थ श्रेणीची कामे दिल्याने शिक्षक आरोग्य सेवकाची कामे करत आहेत.

त्याचप्रमाणे रुग्णांच्या शरीराचे तापमान मोजणे, घरी विलगीकरणात असलेल्या रुग्णांना प्रत्यक्ष भेटी देऊन सेल्फी काढणे, शिधावाटप दुकान, घरोघरी भेट देणे, नाकाबंदीच्या कामामध्ये शिक्षकांची नेमणूक करणे अशी कामे अनेक जिल्ह्यात शिक्षकांना दिली आहे. त्याचबरोबर कोरोना ड्युटीवर असलेल्या शिक्षकांना निवडणुकीच्या कामाचीही जबाबदारी देण्यात येत आहे. त्यामुळे कामे करताना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सोलापूरमध्ये कोरोना ड्युटीवर असलेल्या तीन शिक्षकांचा मृत्यू झाला तर नगर जिल्ह्यातही २ शिक्षकांचा मृत्यू झाला. फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करणार्‍या शिक्षकांना आरोग्याच्या कोणत्याही सुविधा उपलब्ध नाहीत. विमाकवच लागू केलेले नाही. लसीकरण पूर्ण केलेले नाही. तरीही शिक्षक वर्ग अशा वाईट परिस्थितीत काम करत आहे. त्यामुळे शिक्षकांना जिवाची भीती वाटत आहे. शासनाच्या अन्य विभागातील कर्मचारी १५ टक्के उपस्थिती असताना हक्काची उन्हाळी सुट्टी असतानाही शिक्षकांनाच कामाला जुंपण्यात आले आहे.

त्यामुळे एकीकडे फ्रंटलाईन वर्कर म्हणून शिक्षकांकडून कामे करवून घेण्यात येत आहेत, तर दुसरीकडे त्यांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून लसीकरण करण्याकडे राज्य सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने शिक्षकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे राज्यातील तब्बल 25 हजार शिक्षकांना फ्रंटलाईन वर्कर्स प्रमाणेच लसीकरणास प्राधान्य द्यावे, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी केली आहे.

Web Title: More than 25000 teachers on corona duty await vaccination demand to be declared as frontline workers nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2021 | 06:49 PM

Topics:  

  • Covid Prevention Vaccine

संबंधित बातम्या

Medical Warning : COVID लस ठरली प्राणघातक! FDA लावणार ‘Black Box’ची वॉर्निंग; करोडो तरुणांनी ‘यामुळे’ गमावले प्राण
1

Medical Warning : COVID लस ठरली प्राणघातक! FDA लावणार ‘Black Box’ची वॉर्निंग; करोडो तरुणांनी ‘यामुळे’ गमावले प्राण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.