Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

निवासी डाॅक्टर तर कधी वैद्यकीय अधिकारी बनून फिरायचा ‘मुन्नाभाई’; प्रशासनाने केली ‘ही’ कारवाई

मेडिकल (nagpur government medical college) परिसरात फिरणाऱ्या एका तोतया डॉक्टरला मेडिकल प्रशासनाने पकडले. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशाच प्रकारे तो तोतया डॉक्टर मेडिकलमध्ये वावरत होता.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 11, 2021 | 07:47 PM
निवासी डाॅक्टर तर कधी वैद्यकीय अधिकारी बनून फिरायचा ‘मुन्नाभाई’; प्रशासनाने केली ‘ही’ कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur).  मेडिकल (nagpur government medical college) परिसरात फिरणाऱ्या एका तोतया डॉक्टरला मेडिकल प्रशासनाने पकडले. मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटातील कथानकाला शोभेल, अशाच प्रकारे तो तोतया डॉक्टर मेडिकलमध्ये वावरत होता. मात्र, काही डॉक्टरांना त्याच्यावर शंका आल्याने तो अलगद प्रशासनाच्या हातात गवसला. त्याला अजनी पोलिसाच्या (ajni police station nagpur) स्वाधीन करण्यात आले. विशेष असे की, कोरोनाच्या (coronavirus) प्रादुर्भावात या मुन्नाभाईने अनेक मित्रांना सीटी स्कॅनपासून तर कार्ड काढून देण्यापर्यंत मदत करण्याचे सत्कर्म केले. (fraud man found in nagpur government medical college)

[read_also content=”अमरावती/ पंतप्रधान पीकविमा योजनेचा विमा कंपन्यांना फायदा; अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांचा आरोप, योजनेत बदल करण्याची मागणी https://www.navarashtra.com/latest-news/prime-minister-crop-insurance-scheme-benefits-insurance-companies-adv-yashomati-thakur-allegation-demand-for-change-in-the-plan-nrat-141118.html”]

सिद्धार्थ जैन असे या मुन्नाभाईचे नाव आहे. तो २३ वर्षांचा आहे. दिल्लीतील एम्समधून वैद्यकीय पदवी संपादन केल्याचे सांगत होता. काहींना निवासी डॉक्टर तर काहींना मुख्य वैद्यकीय अधिकारी असल्याचा बनाव करीत होता. ऑपरेशन थिऐटरपासून तर विविध वॉर्डात बिनदिक्कत तो प्रवेश करीत होतो. रुग्णांच्या फाईल बघण्यापासून तर नातेवाईकांशी चर्चा करीत असल्याचे चौकशीतून पुढे आले. खरचं तो डॉक्टर आहे का, त्याने वैद्यकीय अभ्यासक्रमाची कोणती आणि कधी पदवी मिळविली इथपासून ते त्याचा मेडिकलमध्ये फिरणाऱ्या दलालांशी काही संबंध आहे, का याचाही पोलिसांकडून शोध सुरू झाला. मात्र, यात त्याने बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम पूर्ण केला असून त्याला डॉक्टर बनायचे होते.

कोणालाही संशय येऊ नये म्हणून शल्यक्रियागृहात वापरला जाणारा हिरवा रंगांचा ड्रेसकोड तसेच गळ्यात स्टेथॉस्कोप घालून बेधडकपणे मेडिकलमध्ये फिरत होता. गुरुवारी सकाळी मेडिकलच्या जुन्या कॅज्युअल्टीजवळील डिझास्टर वॉर्डात आला. तिथे तो एका रुग्णाची चौकशी करीत होता. निवासी डॉक्टरांना त्याचा संशय आल्याने त्यांनी वरिष्ठांना याची माहिती दिली. या बाबत तातडीने मेडिकलमधील सुरक्षा रक्षकांना माहिती देण्यात आली. सुरक्षा रक्षकांनी पाळत ठेवली. मात्र, आपल्यावर पाळत असल्याचे त्याला कळले. दरम्यान, पळून जाण्याचा प्रयत्न केला. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडले आणि अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले.

तोतया डॉक्टरच्या मोबाईलमध्ये मिळालेल्या काही मोबाईल क्रमांकावर फोन केले असता, कोविड काळात अनेकांना त्याने मदत केली असल्याचे चौकशीतून पुढे आले. बऱ्याच जणांना वॉर्डात प्रवेश देण्यापासून तर सीटी स्कॅन, कार्ड काढून देण्यापर्यंत मदत केली असल्याचे पुढे आले.

Web Title: Munnabhai who used to be a resident doctor and sometimes a medical officer the administration took this action nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2021 | 07:47 PM

Topics:  

  • Medical Hospital

संबंधित बातम्या

A, B, AB किंवा O नाही तर भारतात सापडलाय जगातील पहिला रहस्यमयी ब्लड ग्रुप; पाहून डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का
1

A, B, AB किंवा O नाही तर भारतात सापडलाय जगातील पहिला रहस्यमयी ब्लड ग्रुप; पाहून डॉक्टरांनाही बसला आश्चर्याचा धक्का

सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; मुख्यालय सोडून न जाण्याच्या सूचना
2

सरकारी रुग्णालयांमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; मुख्यालय सोडून न जाण्याच्या सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.