''केवळ पंतप्रधानांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच...''; मालवणमधील घटनेवर जयंत पाटलांची संतप्त प्रतिक्रिया
मालवणमधील सिंधुदुर्ग राजकोट किल्ल्यावर असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याची घटना आज, सोमवारी दुपारी घडली. पुतळा कोसळल्याने शिवप्रेमी संतत्प झाले आहेत. 4 डिसेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुतळ्याच अनावरण करण्यात आले होते. निकृष्ट बांधकामामुळे हा शिवरायांचा पुतळा कोसळ्याचाा आरोप शिवप्रेमी करत आहेत.येथील शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आला. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि नेते जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची घटना मालवणमध्ये घडली आहे. त्यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले, ”मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच सत्ताधाऱ्यांचे ध्येय होते. त्यामुळे या निर्माण कार्याच्या दर्जाची, गुणवत्तेची काळजी घेतली गेली नाही. हे इव्हेंटजीवी सरकार आहे. त्यांना कामाच्या दर्जाचं घेणं देणं नाही. कमीशन घ्यायचे आणि कंत्राटे वाटायची एवढंच काम निष्ठेने सुरू आहे. राज्यभर सुरू असलेली रस्त्याची कामे देखील सुमार दर्जाची आहेत. महाराजांचा पुतळा बनवताना देखील असाच घोटाळा केला असणार. त्यामुळेच तेथील भौगोलिक परिस्थितीत पुतळा उभा राहू शकला नाही. ही सर्वस्वी महाराष्ट्र सरकारची जबाबदारी आहे.”
मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची बातमी अतिशय धक्कादायक आहे. यामुळे राज्यातील तमाम शिवप्रेमी दुखावले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवताना काळजी घेतली गेली नाही. केवळ पंतप्रधान यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करायचे हेच… pic.twitter.com/mpVYqg3qAO
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) August 26, 2024
राजकोट येथील शिवपुतळा संकुलाचे सुशोभीकरण व इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. राज्य सरकार आणि नौदल विभागाने निर्णय घेतल्यानंतरच राजकोट येथे पुतळा उभारण्याचे काम सुरू झाले. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच आहे.
डिसेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. दरम्यान हा पुतळा कोसळल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक हे चांगलेच आक्रमक झाले आहेत. वैभव नाईक या घटनेनंतर सरकारी कार्यालयाची तोडफोड केली आहे. नित्कृष्ट कामामुळे हा पुतळा कोसळल्याचे आमदार नाईक म्हणाले. दोषींवर गुन्हे दाखल झाले नाही तर आम्ही केवळ जिल्ह्यात नव्हे तर, राज्यभर आंदोलन करण्याचा इशारा नाईक यांनी दिला आहे.