Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

न्यूझीलंडच्या केन विल्यमसनने दिला राजीनामा; कर्णधार पद सोडले, सेंट्रल कॉन्ट्रॅक्टदेखील नाकारले; कारण वाचून व्हाल थक्क

Kane Williamson : टी-20 विश्वचषकातील खराब परफॉर्मन्सनंतर किवींचा संघ सुपर-8मधून बाहेर पडला आहे. यानंतर आता न्यूझीलंडला दुसरा धक्का बसला आहे. कारण कर्णधार केन विल्यमसनने केंद्रीय करार नाकारत आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्याने 2024-2025 हंगामासाठी न्यूझीलंडचा केंद्रीय करार घेण्यास नकार दिला आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Jun 19, 2024 | 02:57 PM
New Zealand Kane Williamson resigns

New Zealand Kane Williamson resigns

Follow Us
Close
Follow Us:

Kane Williamson Resigns : अनुभवी किवी खेळाडू केन विल्यमसनने बुधवारी म्हणजेच १९ जून रोजी न्यूझीलंड क्रिकेटला मोठा धक्का दिला आहे. त्याने सांगितले की 2024-25 हंगामासाठी तो नवीन केंद्रीय करार घेणार नाही. विल्यमसनने न्यूझीलंड क्रिकेटकडून खेळत राहण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्याने कर्णधारपदही सोडले आहे. 33 वर्षीय विल्यमसन न्यूझीलंडच्या उन्हाळ्यात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे. त्यामुळे तो या कालावधीत न्यूझीलंडकडून खेळू शकणार नाही. त्याशिवाय तो न्यूझीलंडकडून खेळण्यासाठी नेहमी तयार असेल असेही त्याने म्हटले आहे.

याच कारणामुळे विल्यमसनने केंद्रीय करार नाकारला
केन विल्यमसन म्हणाला की तो न्यूझीलंडच्या उन्हाळी हंगामात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे, ज्यामुळे तो न्यूझीलंडचा केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. याशिवाय, त्याने असेही सांगितले की त्याला आपल्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवायचा आहे.

काय म्हटलाय केन आपल्या पत्रात वाचा

केन विल्यमसन म्हणाला, ‘मला संघाच्या प्रगतीसाठी प्रत्येक प्रकारे मदत करण्याची खूप आवड आहे आणि त्यात योगदान देत राहायचे आहे. पण मी न्यूझीलंडच्या उन्हाळ्यात परदेशी लीगमध्ये खेळण्याची संधी शोधत आहे त्यामुळे मी केंद्रीय करार स्वीकारू शकत नाही. न्यूझीलंडकडून खेळणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे आणि संघासाठी काही करण्याची माझी इच्छा कमी झालेली नाही. मात्र, क्रिकेटबाहेरील माझे जीवन बदलले आहे आणि माझ्या कुटुंबासोबत अधिक वेळ घालवणे आणि त्यांच्यासोबत देश किंवा परदेशात प्रवास करणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे झाले आहे.

केन विल्यमसनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
33 वर्षीय केन विल्यमसनने 2010 पासून न्यूझीलंडकडून 100 कसोटी, 165 एकदिवसीय आणि 93 टी-20 सामने खेळले आहेत. विल्यमसनच्या नावावर कसोटीत 8743, एकदिवसीयमध्ये 6810 आणि टी-20मध्ये 2575 धावा आहेत. याशिवाय तो कधीकधी गोलंदाजी करतानाही दिसतो. विल्यमसन हा उजवा हात ऑफ स्पिनर आहे. त्याने टेस्टमध्ये 30, एकदिवसीयमध्ये 37 आणि टी-20मध्ये 6 विकेट्स घेतल्या आहेत.

 

Web Title: New zealands kane williamson resigns relinquished captaincy also rejected central contract read in details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2024 | 02:54 PM

Topics:  

  • New Zealand cricket team

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.