Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबईकरांच्या कामाची बातमी! नक्की वाचा, बोरिवली ते सीएसएमटी लवकरच लोकल प्रवास सुरु होणार

पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचता येणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचं काम नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे. सध्या बोरिवलीहून सीएसएमटी इथं पोहोचण्यासाठी माहीम किंवा दादरला उतरावे लागते. गोरेगाव-माहिमवरून हार्बरमार्गे आणि दादरवरून मध्य रेल्वे मार्गे सीएसएमटीला पोहोचता येते. पण तुम्ही आता हा मार्ग सुरु झाल्यानंतर थेट सीएसएमटीवरुन बोरिवलीला जाऊ शकता.

  • By Amrut Sutar
Updated On: Oct 21, 2021 | 02:59 PM
मुंबईकरांच्या कामाची बातमी! नक्की वाचा, बोरिवली ते सीएसएमटी लवकरच लोकल प्रवास सुरु होणार
Follow Us
Follow Us:

मुंबई : आता मुंबईकरांसाठी एक कामाची बातमी समोर येत आहे. तुम्ही जर ही बातमी वाचली नसेल तर, ही बातमी नक्की वाचा. आता मुंबईकरांच्या लोकल प्रवास अधिक सुखकर होणार. मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पश्चिम रेल्वेच्या बोरीवली स्थानकातून मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं पोहोचता येणार आहे. हार्बर मार्गाच्या विस्तारीकरणाचं काम नव्या वर्षाच्या मुहूर्तावर सुरू करण्यात येणार आहे. सध्या बोरिवलीहून सीएसएमटी इथं पोहोचण्यासाठी माहीम किंवा दादरला उतरावे लागते. गोरेगाव-माहिमवरून हार्बरमार्गे आणि दादरवरून मध्य रेल्वे मार्गे सीएसएमटीला पोहोचता येते. पण तुम्ही आता हा मार्ग सुरु झाल्यानंतर थेट सीएसएमटीवरुन बोरिवलीला जाऊ शकता. किंवा बोरिवलीहून थेट सीएसएमटीला पोहचणार आहात.

अलायनमेंट सर्वेक्षण

जागेची अडचण असल्यानं मालाड स्थानक उन्नत बनवण्याचा निर्णय घेण्यात आला असून गोरेगाव ते कांदिवलीदरम्यान सुमारे ३ किमीचा मार्गही उन्नत असणार आहे. उर्वरित मार्ग जमिनीला समांतर असणार आहे. गोरेगाव ते बोरिवलीदरम्यान हार्बर मार्गावर रुळ उभारण्यासाठी पूर्व तयारी म्हणून ‘अलायनमेंट सर्वेक्षण’ सुरू आहे. ड्रोन तसंच आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं हे सर्वेक्षण पूर्ण करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी निविदेतून १८ पैकी १३ सल्लागारांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रकल्पातील जमीन, झाडे, जमिनीखाली १.५ मीटर खोल वापरात असलेल्या विविध पाइपलाइन यांचं सर्वेक्षण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळं नवीन वर्षात ह्या रेल्वमार्ग सुरु होणार आहे.

बोरिवली ते सीएसएमटी हा मार्ग सुरु झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेची बचत होईल. तसेच तिकिटदर सुदधा कमी असले असं सुत्रांनी म्हटले आहे. सद्यस्थितीत असलेल्या रेल्वे रुळांच्या शेजारी नवे रूळ टाकण्यासाठी जागेची प्रचंड अडचण आहे. सर्वक्षणाअंती कोणत्या स्थानकादरम्यान किती जागेची आवश्यकता आहे, उन्नत मार्गासाठी जागेची गरज याची तपशीलवार माहिती मिळेल, त्यानुसार निविदा मागवून कामे सुरू करण्याचे नियोजन असल्याचे पश्चिम रेल्वेने स्पष्ट केले. मुंबई रेल्वे विकास महामंडळ (एमआरव्हीसी) मुंबई शहरी परिवहन प्रकल्प (एमयूटीपी) ३ अ मध्ये गोरेगाव ते बोरिवली (७.८ किमी) असा हार्बर विस्तारीकरणाचा प्रकल्प मांडण्यात आला. एप्रिल २०१९ मध्ये रेल्वे मंडळाने याला मंजुरी दिली. गोरेगाव ते हार्बर विस्तारीकरण प्रकल्पाचा अपेक्षित खर्च ७४५.३१ कोटी इतका आहे. याचबरोबर मध्य आणि पश्चिम रेल्वेसाठी स्टेबलिंग मार्ग सुद्धा उभारण्यात येणार आहे. याचा अंदाजे खर्च ४८५ कोटी इतका आहे. त्यामुळं बोरिवली ते सीएसएमटी या मार्गवर लवकरच लोकल सुरु व्हावी अशी प्रवाशांची मागणी असून, या बोरिवली ते सीएसएमटी या मार्गावर सुरु होणाऱ्या लोकलमुळं मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे.

Web Title: News of mumbaikars work read on local journey from borivali to csmt will start soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 21, 2021 | 02:59 PM

Topics:  

  • central railway line

संबंधित बातम्या

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क
1

Mumbai News: रेल्वे स्थानकातच मिळणार किराणा, झेरॉक्स! नायगाव, विरार स्थानकातील मोकळ्या जागेत व्यावसायिक कियोस्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.