फोटो सौजन्य- Social Media
कार ही प्रत्येकासाठी महत्वाचा घटक ठरु लागली आहे. त्यामुळे भारतीय कार बाजारपेठही वाढत आहे. अनेक मोठ मोठ कंपन्या भारतीय बाजारपेठेवर लक्ष ठेऊन त्यांच्या कार लॉंच करत आहेत. बाजारपेठेतील स्पर्धा ही ग्राहकांसाठी नेहमीच फायदेशीर ठरत आहे. मात्र सरकारकडूनही ग्राहकांचा फायदा व्हावा यासाठी पाऊले उचलण्यात येत आहेत. सणांच्या काळात अनेक कार उत्पादक कंपन्यांनी एक करार केला आहे त्यामुळे जर तुमची जुनी कार स्क्रॅप करुन नवीन कार घेतल्यास तुम्हाला 1.5-3.5 टक्के सूट मिळणार आहे. यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी प्रयत्न केले आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, काही मोठ्या लक्झरी कार कंपन्यांनी यासाठी सुमारे 25000 रुपयांची सवलत देण्याचे मान्य केले आहे, तर इतर कंपन्याही या सवलतीसंबंधी माहिती देणार आहेत.
मंत्री नितिन गडकरी यांचा पुढाकार
ऑटो कंपन्या आणि केंद्र सरकारकडून या योजनेची घोषणा केली जाणार आहे. मार्च 2021 मध्ये देशात स्क्रॅपिंग धोरण लागू केल्यापासून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी हे अशा प्रकारच्या योजनेवर भर देत आहेत. या योजनेमुळे खरेदीदारांना त्यांची जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी सवलत आणि कमी GST यासारखे प्रोत्साहन मिळाले पाहिजे असा गडकरी यांचा प्रयत्न आहे.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून सल्ला
2022 मध्ये, मंत्रालयाने ऑटोमोबाईल युनियन्सना आणि त्यांच्या सदस्यांना स्क्रॅपिंग वाहनांच्या बदल्यात विक्रीच्या किंमतीवर 5% पर्यंत सवलत देण्यास सांगितले होते, परंतु ऑटोमोबाईल उद्योगाने या सल्ल्याकडे दुर्लक्ष केले आणि अशी सवलत आणण्याचा निर्णय घेतला जी व्यावसायिकदृष्ट्या व्यवहार्य आहे. या योजनेसाठी सरकारने 60 नोंदणीकृत वाहन स्क्रॅपिंग सुविधा आणि 75 स्वयंचलित चाचणी केंद्रे स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
ग्राहक, उत्पादक दोघांना फायदा
अशी स्क्रॅपिंग पोलिसी ही प्रत्येक जुने वाहन असलेल्या प्रत्येक वाहनचालकासाठी अत्यंत महत्वाची ठरणार आहे. ज्यामुळे जुने वाहन स्क्रॅप करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. तसेच वाहन निर्मात्या कंपनीलाही याचा फायदा होणार आहे की, ग्राहकही या पर्यायामुळे नवीन वाहन खरेदी करण्याचा लवकर विचार करणार आहे ज्यामुळे नवीन वाहन खरेदीसाठी ग्राहकही उत्सुक असणार आहे.