(फोटो सौजन्य- Xअकाउंट)
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत मिशन नावाची मोहीम राबवत आहेत. स्वच्छता आणि स्वच्छतेला चालना देण्याच्या उद्देशाने ही देशव्यापी मोहीम आहे. तसेच आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त अभिनेत्री आलिया भट्टही या मिशनमध्ये सहभागी झाली आहे. नुकताच पीआयबी इंडियाने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री स्वच्छ भारत मिशनला पाठिंबा देताना दिसत आहे. शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आलिया म्हणाली, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छ भारत मिशन हे गांधीजींचे स्वच्छ आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. आपण सर्वांनी मिळून या मिशनला नवीन उंचीवर घेऊन जाऊयात आणि आपला देश आणखी सुंदर बनवूया.” असे या व्हिडीओमध्ये अभिनेत्री म्हणताना दिसली आहे.
आलियाने यापूर्वीही प्रचार केला आहे
आलिया सरकारी मिशनचा भाग होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 2017 मध्ये त्यांनी वरुण धवनसोबत स्वच्छ भारत आंदोलन मोहिमेत देखील अभिनेत्रीने सहभाग घेतला होता आणि अनेक व्हिडिओ कॅम्पेनही केले होते. नोव्हेंबर 2017 मध्ये, तिने एक व्हिडिओ शेअर केला ज्यामध्ये ती म्हणत होती, “आपली पृथ्वी ते… आपले घर! हे स्वच्छ ठेवणे आपले कर्तव्य आहे.” असे ती म्हणाली होती.
Actor Alia Bhatt joins the Swachh Bharat movement! The #SwachhBharatMission spearheaded by Prime Minister @narendramodi marks a significant step towards realising Gandhi Ji’s dream of a clean and self-reliant India. Let’s all come together and take this mission to new heights… pic.twitter.com/6WcnfyWnKI — PIB India (@PIB_India) October 2, 2024
हे देखील वाचा- आमिर खानची माजी पत्नी रीना दत्ताच्या वडिलांचे निधन, अभिनेता आईसह पोहचला राहत्या घरी!
पंतप्रधान मोदींनी लोकांना केले आवाहन
स्वच्छ भारत मिशन 2 ऑक्टोबर 2014 रोजी सुरू झाले. आज या उपक्रमाला एक दशक पूर्ण झाले आहे. या खास प्रसंगी त्यांनी नवी दिल्लीतील एका शाळेत स्वच्छता मोहिमेत भाग घेतला. कार्यक्रमातील एक छायाचित्र शेअर करताना पीएम मोदी म्हणाले, ‘आज गांधी जयंतीच्या दिवशी मी माझ्या तरुण मित्रांसोबत स्वच्छतेशी संबंधित उपक्रमात भाग घेतला. मी तुम्हा सर्वांना विनंती करतो की, दिवसभर अशा काही उपक्रमात सहभागी व्हा आणि स्वच्छ भारत मिशनला बळकट करत राहा. #स्वच्छ भारताची १० वर्षे.’ असे लिहून त्यांच्या सह भारताने स्वच्छ भारत अभियानाची १० वर्ष साजरी करत आहेत.