Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात एकाला अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने एका तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तत्पुर्वी आता या पेपर फुटीप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 01, 2021 | 07:31 PM
राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या पेपरफुटी प्रकरणात एकाला अटक; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : राज्यभर गाजलेल्या आरोग्य विभागाच्या (Health Department) पेपर फुटीप्रकरणात पुणे पोलीसांच्या सायबर सेलने एका तरुणाला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. तत्पुर्वी आता या पेपर फुटीप्रकरणात मोठे रॅकेट उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

विजय प्रल्हाद मुराडे (वय २९, रा. नांदी, ता. अंबड, जि. जालना) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत आरोग्य विभागाच्या मुख्य प्रशासकीय अधिकारी स्मिता कारेगावकर यांनी तक्रार दिली आहे.

राज्यात आरोग्य विभागाच्या वतीने ३१ ऑक्टोबर रोजी ‘ड’ संवर्गातील पदाच्या लेखी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर वेळेपुर्वीच फुटला होता. सकाळी साडेआठ वाजताच पेपर व्हायरल झाला होता. एका कागदावर पेनाने प्रश्न व उत्तरे लिहिलेला पेपर फुटल्याने खळबळ उडाली होती. ९२ मार्कचे प्रश्न सोडविण्यात आले होते. त्यामुळे पेपर फुटल्याची तक्रार करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. परंतु, त्याबाबत आरोग्य विभागाकडून काहीही माहिती न दिल्याने तेव्हा गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, नुकतीच आरोग्य विभागाने तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.

पुणे पोलीसांच्या सायबर गुन्हे शाखेने याप्रकरणात तत्काळ तपासाला सुरूवात करत एकाला अटक केली आहे. त्यामुळे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. दरम्यान, विजय मुराडे याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अधिक तपास सायबर पोलीस करत आहेत.

Web Title: One arrested in a state wide health department paper leak case major action of pune police nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 01, 2021 | 07:27 PM

Topics:  

  • आरोग्य विभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.