Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Memon Asset : टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकारला सोपवा- मुंबई विशेष न्यायालयाचे आदेश

१९९३ च्या बॉम्बस्फोटांचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या आदेशावरून त्याच्या साथीदार टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांच्या मदतीने रचला होता.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Apr 02, 2025 | 12:49 PM
Tiger Memon Asset : टायगर मेमनची संपत्ती केंद्र सरकारला सोपवा- मुंबई विशेष न्यायालयाचे आदेश
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई :  मुंबईतील १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य सूत्रधार टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबाच्या १४ मालमत्ता केंद्र सरकारकडे सोपवण्याचा आदेश विशेष न्यायालयाने दिला आहे. बॉम्बस्फोटाच्या ३२ वर्षांनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. या मालमत्ता १९९४ पासून मुंबई उच्च न्यायालयाच्या ‘रिसीव्हर’च्या ताब्यात होत्या.

टायगर मेमनच्या या  संपत्तीत वांद्रे पश्चिम येथील  एका इमारतीतील फ्लॅट, माहीममधील ऑफिस कॉम्प्लेक्स, प्लॉट, सांताक्रूझ (पूर्व) मधील प्लॉट आणि फ्लॅट, कुर्ल्यातील दोन फ्लॅट, मोहम्मद अली रोडवरील ऑफिस, डोंगरीमधील दुकान व प्लॉट, मनीष मार्केटमधील तीन दुकाने आणि मुंबईतील शेख मेमन स्ट्रीटवरील एक इमारत यांचा समावेश आहे.

Waqf Amendment Bill : वक्फचे व्यवस्थापन आता सरकारच्या हातात; AIMPLB चे थेट आव्हान, “जर विधेयक मंजूर झाले

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईत झालेल्या १३ बॉम्बस्फोटांत २५७ लोक मृत्युमुखी पडले होते, तर ७०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या प्रकरणाचा तपास नंतर सीबीआयने हाती घेतला.  विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.डी. केदार यांनी २६ मार्च रोजी ही संपत्ती केंद्र सरकारकडे  सोपवण्याचे आदेश दिले आहेत. “स्थावर मालमत्तेचा ताबा केंद्र सरकारकडे सोपवला पाहिजे. दहशतवादी आणि विध्वंसक क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा-१९८७ (टाडा) अंतर्गत सरकारला ही संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार असल्याचे या आदेशात म्हटले आहे.

१९९३ मध्ये सक्षम अधिकाऱ्यांनी या मालमत्तांच्या जप्तीचे आदेश दिले होते. मात्र, विशेष टाडा न्यायालयाने १९९४ मध्ये या मालमत्ता जप्त केल्या आणि त्या उच्च न्यायालयाच्या ताब्यात होत्या. तस्कर आणि परकीय चलन हाताळणारे (मालमत्ता जप्त करणे) कायद्यांतर्गत सक्षम अधिकाऱ्यांनी या मालमत्ता सोडण्याची मागणी केली होती. याचिकेत नमूद केले होते की, हा कायदा तस्करांच्या बेकायदेशीर संपत्तीचा शोध घेऊन ती केंद्र सरकारकडे हस्तांतरित करण्यास मदत करतो.

या आदेशापूर्वी विशेष  न्यायालयाने टायगर मेमन आणि त्याच्या कुटुंबीयांना नोटीस बजावली होती. मात्र, त्यांनी कोणतेही उत्तर दाखल न केल्याने, रेकॉर्डवरील कागदपत्रांच्या माध्यमातून  न्यायाधीशांनी १९९४ मध्ये पारित केलेला जप्तीचा आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतला.

Fadnavis-Raut Twitter war: ‘तुमच्यात हा दम आहे का..?’ वक्फ विधेयकावरून फडणवीस-राऊतांमध्ये जुंपली

कधी झाले होते मुंबईत साखळी बॉम्बस्फोट ?

१२ मार्च १९९३ रोजी मुंबईच्या विविध भागात झालेल्या १३ बॉम्बस्फोटांच्या मालिकेत २५७ लोक मृत्युमुखी पडले आणि ७०० जखमी झाले. नंतर, सीबीआयने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. गेल्या आठवड्यात २६ मार्च रोजी दिलेल्या आदेशात, विशेष टाडा न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. डी. केदार म्हणाले की, स्थावर मालमत्तेचा ताबा केंद्राकडे सोपवला पाहिजे.

सीबीआयच्या म्हणण्यानुसार, १९९३ च्या बॉम्बस्फोटांचा कट अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेच्या आयएसआयच्या आदेशावरून त्याच्या साथीदार टायगर मेमन आणि मोहम्मद डोसा यांच्या मदतीने रचला होता. दाऊद इब्राहिम आणि टायगर मेमन अजूनही वॉन्टेड आरोपी आहेत. या प्रकरणात टायगर मेमनचा भाऊ याकूब मेमनला दोषी ठरवण्यात आले आणि २०१५ मध्ये त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली.

Web Title: Order to hand over assets of mumbai blast mastermind tiger memon to the central government nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 02, 2025 | 12:49 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.