चंद्रपूरच्या ब्रह्मपुरीत पुराचे थैमान; गोसेखुर्दच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस,
नागपूर : राज्यातील अनेक भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. तर काही भागांत पावसाने उघडीप दिल्याचे चित्र आहे. नागपुरात मंगळवारी पावसाने दडी मारल्याने तापमानात वाढ झाल्याचे पाहिला मिळाले. या तापमानवाढीमुळे नागपूरकरांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. हवामान खात्याने बुधवारपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
हेदेखील वाचा : पुणे, मुंबईसह राज्यातील अनेक भागांना मुसळधार पावसाने झोडपले; हवामान विभागाकडून ‘रेड अलर्ट’ जारी
काही ठिकाणी मुसळधार पाऊसही पडण्याची शक्यता आहे. शहरात मंगळवारी पावसाने उसंत घेतली. सूर्यही चांगलाच तळपला. त्यामुळे नागपूरकरांना चटके सहन करावे लागले. मंगळवारी शहरात 32.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील सर्वच जिल्ह्यात मंगळवारी तापमान 33 अंशाच्या जवळपास होते. मंगळवारी तापले असले तरी हवामान खात्याने आजपासून 31 ऑगस्टपर्यंत काही भागात जोरदार ते अति जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
पावसाने जवळपास सात ते आठ दिवस दडी मारल्यानंतर मागील आठवड्यात जोरदार कमबॅक केले होते. कालही काही भागात सरी कोसळल्या. मंगळवारी मात्र विश्रांती घेतली. ऑगस्ट महिन्याची सुरुवात जशी जोरदार पावसाने झाली होती, तसाच आता ऑगस्ट महिन्याचा शेवटही जोरदार पावसाने होणार असा अंदाज आहे.
हेदेखील वाचा : महाराष्ट्र, गुजरातसह अनेक राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाकडून अलर्ट जारी