goa assembly
पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. १४ फेब्रुवारीला विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी मतदान होत आहे. उद्या होणाऱ्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी तयारी पुर्ण झाली असून, अफवांवर विश्वास ठेवता निर्भयपणे मतदान करण्याचं आवाहन गोव्याच्या मुख्य निवडणुक अधिकारी आयए एस कुणाल यांनी केलं आहे.
[read_also content=”कोल्हापुरात बर्निंग ट्रकचा थरार; पुणे-बंगळुरू महामार्गावर ट्रकने अचानक घेतला पेट https://www.navarashtra.com/kolhapur/tremor-of-burning-truck-in-kolhapur-on-the-pune-bangalore-highway-a-truck-suddenly-caught-fire-nrvk-237404.html”]
देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. उत्तर प्रदेश, (UP) गोवा (Goa), पंजाब (Punjab), उत्तराखंड(Uttarakhnad) आणि गोवा(Goa) या राज्यातील विधानसभा निवडणुका होत आहेत. गोवा आणि उत्तराखंड विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. १४ फेब्रुवारीला विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी मतदान होत आहे. तर, उत्तराखंडमध्येही १४ फेब्रुवारीला मतदान पार पडत असल्याने ७० जागांवर उमेदवार आपलं नशीब आजमावणार आहेत. गोव्यातील 40 जागांसाठी 301 उमदेवार रिंगणात आहेत. दरम्यान उद्या होणाऱ्या मतदानाची तयारी पुर्ण झाली असून बंदोबस्तासाठी सेंट्रल फोर्स गोव्यात दाखल झाली आहे. तर, जेष्ठ नागरिकांना मतदान त्यांच्या घरी करता येणार असून त्यासाठी १९५० या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही गोवा निवडणूक आयोगानं केलयं.
[read_also content=”अवैध वाहतूक करणारा रेती तस्करीचा ट्रॅक्टर कुणाच्या मालकीचा, कधी निघेल पंचनाम्याचा मुहूर्त ? https://www.navarashtra.com/bhandara/vidarbha/bhandara/who-owns-the-tractor-for-smuggling-sand-nraa-237391https://www.navarashtra.com/maharashtra/vidarbha/bhandara/who-owns-the-tractor-for-smuggling-sand-nraa-237391.html”]