Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गट ‘ड’ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेण्याची तयारी; राजेश टोपेंची घोषणा

कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिकतेला धरून नव्हते, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधान परिषदेत दिली.

  • By Navarashtra News Network
Updated On: Dec 22, 2021 | 05:13 PM
गट ‘ड’ची परीक्षा एक पैसाही न घेता पुन्हा घेण्याची तयारी; राजेश टोपेंची घोषणा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कोरोना काळात आरोग्य विभागाची भरती होणे आवश्यक होते. या सगळ्या जागा भराव्यात, अशी सरकारची भूमिका आहे. गट क आणि गट ड भरतीत जे घडले ते नैतिकतेला धरून नव्हते, अशी कबुली आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी विधान परिषदेत दिली.

कुंपणाने शेत खाल्याची बाब समोर आल्याने त्यात दुरुस्ती आवश्यक आहे. जनतेच्या हितासाठी आरोग्य भरती करणे चुकीचे नाही. जे लोक या प्रकरणी दोषी आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्यात कोणतीही अडचण नाही, असेही टोपे म्हणाले. दोषींना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी सरकार करणार नाही. या प्रकरणी न्यायाधीशांमार्फतही चौकशीची सरकारची तयारी असल्याचे सांगत त्यांनी विनामूल्य पुन्हा परीक्षा नव्या पध्दतीने घेण्याची तयारी असल्याचे सांगितले.

गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या घोटाळ्याची पोलीस चौकशी

ते म्हणाले की, गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या घोटाळा कामी पोलीस चौकशी करत आहेत. गट क संदर्भात सध्या कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आहे. गट ड संदर्भात अडचणी समोर आल्या आहेत. पोलीस तपासात बाबी समोर आल्यानंतर त्यासंदर्भात योग्य निर्णय घेऊ, असे राजेश टोपे म्हणाले. यावेळी भाजप सदस्य गोपीचंद पडळकर आणि विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यानी आक्रमक पवित्रा घेतला. गट ‘क’साठी १५ लाख रुपये आणि गट ‘ड’साठी ८ लाख रुपयाचा उल्लेख ऑडिओ क्लिपमध्ये समोर आहे.

अमरावतीमध्ये दोनशे विद्यार्थ्यांनी पैसे दिले आहेत ही माहिती खरी आहे का? महेश बोटले हे सहसंचालक आहेत, त्यांचे धागेदोरे मंत्र्यांपर्यंत पोहोचत असतील तर सरकार यासंदर्भात चौकशी करणार का? असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केला. दलालांची ऑडिओ क्लिप सायबरकडून तपासली जात आहे. तुमच्या सगळ्यांच समाधान करण्याची माझी जबाबदारी आहे. चौकशीत याची पाळंमुळे खोदून काढून दोषीवर कारवाई करु, असे राजेश टोपे म्हणाले.  ते म्हणाले की, याबाबत आरोग्य विभागाने स्वत: एफआयआर केलेला आहे. आमचा हेतू स्वच्छ होता, असे राजेश टोपे म्हणाले.

एक पैसा न घेताही पुन्हा परीक्षा घेऊ

यावेळी न्यासाला काम का दिले, असा सवाल प्रविण दरेकर यांनी केला. म्हाडा, आरोग्य भरती, टीईटी परीक्षा या संदर्भात विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळले जात आहे. एकाच दिवशी दोन परीक्षा घेतल्या जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ चालणार नाही, असे प्रविण दरेकर म्हणाले.

निवृत्त मुख्य न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करु, असेही राजेश टोपे म्हणाले. न्यासा कंपनी न्यायालयात गेली होती. त्यानंतर न्यासाची निवड करण्यात आले. आपल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा नव्या परीक्षा पद्धतीने घेतली जाईल. गट ड ची परीक्षा पुन्हा घ्यायची असल्यास पुन्हा एक पैसा न घेताही घेऊ, असे राजेश टोपे म्हणाले.

Web Title: Preparing to retake the group d exam without taking a single penny says rajesh tope nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 22, 2021 | 05:13 PM

Topics:  

  • rajesh tope
  • राजेश टोपे

संबंधित बातम्या

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : राजेश टोपे
1

सकारात्मकपणे काम करणारी आजची तरुणाई सर्वांसाठी प्रेरक : राजेश टोपे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.