
सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले मित्र परिवार यांच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत सुमारे ४५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत २७ विजेते स्पर्धकांना सन्मानचिन्ह, रोख परितोषिक व सहभागी स्पर्धकांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, शिवछत्रपतींचे विचार, कार्य व शिकवण ही लोकहिताची होती. ती या स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धकांच्या माध्यमातून पुन्हा पुढे आली आणि थोरांपासून लहान मुलांच्यात ती शिकवण रूजलेली आहे. त्यामुळे आपला महाराष्ट्र आपलादेश प्रगतीपथावर जाईल, हा सर्वांना आत्मविश्वास आहे. आयोजन केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा व्यक्त केल्या.
बाळासाहेब महामुलकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना पुढे नेण्यासाठी तसेच तरुण विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने स्पर्धा आयोजित केली होती. यापुढेही विविध स्पर्धांच्या माध्यमातून समाजहिताचे कार्यक्रम राबिवले जातील, असे आश्वासित केले.
स्पर्धेतील विजेते स्पर्धक
निबंध स्पर्धा
खुला गट
भाग्यश्री विश्वजीत चव्हाण (विजेता), अक्षता संजय निकम (उपविजेता), समीना अमीर शेख (उत्तेजनार्थ)
मोठा गट
आदिती ज्ञानदेव चोरट (विजेता) आदित्य संजय शिंदे (उपविजेता) अनुष्का जयकुमार चौगुले (उत्तेजनार्थ)
लहान गट
राजनंदनी विजय पाटील (विजेता), परिणीती प्रसाद कदम (उपविजेता), समीक्षा सागर कांबळे (उत्तेजनार्थ).
चित्रकला स्पर्धा
खुला गट..*आरती मधुकर सुतार (विजेता)वृषाली विनोद कदम (उपविजेता) साहिल सचिन वाघडॉळे (उत्तेजनार्थ)
मोठा गट.. आर्यन कल्पेश मुळीक (विजेता) जय विजय मुळे (उपविजेता) दिपाल कैलास माळी (उत्तेजनार्थ)
लहान गट.. आराध्या अण्णासाहेब शिंदे (विजेता) समर्थ नवनाथ पवार (उपविजेता) माही मेघराज सावेकर (उत्तेजनार्थ)
वक्तृत्व स्पर्धा
खुला गट…. शिवम संजय माळकर (विजेता) प्रियदर्शनी जयगोंडा पाटील (उपविजेता) ओमकार शिवाजी गीते (उत्तेजनार्थ)
मोठा गट.. यशराज आप्पा हेगडे (विजेता) निरंजलि सचिन मोरे (उपविजेता) पृथ्वी अजय मांढरे (उत्तेजनार्थ)
लहान गट.. श्रेया नितीन शिवणकर (विजेता) अनघा सुनील काकडे (उपविजेता) शिवम संतोष शेटे (उत्तेजनार्थ).