सोलापूर / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी ग्रामसेवक, शिक्षक, कर्मचाऱ्यांसाठी काढलेल्या आदेशाचा दणका ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale) यांना बसला आहे.
जिल्ह्यात कोरोना संसर्गात वाढ झाल्यावर शाळा बंद करण्यात आल्या कार्यालयीन उपस्थिती यावरही निर्बंध घालण्यात आले. दिलीप स्वामी यांनी ग्रामसेवक शिक्षक व कर्मचाऱ्यांनी मुख्यालय परवानगीशिवाय येऊ नये असा आदेश काढला होता. या पार्श्वभूमीवर अमेरिकेला जाण्यासाठी परवानगी मागण्यासाठी ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुवारी जिल्हा परिषद मुख्यालयात आले होते. ते विनापरवाना आले म्हणून परितेवाडी शाळेतील त्यांची हजेरी बिनपगारी करण्यात आली, अशी माहिती स्वतः डिसले यांनीच प्रसारमाध्यमांना दिली.
रणजितसिंह ग्लोबल टिचर डिसले हे गेल्या अनेक वर्षापासून शासकीय सेवेत गैरहजर राहिल्याने ते प्रशासकीय कारवाईच्या कचाट्यात सापडले आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी रणजितसिंह डिसले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. टिचर डिसले गेल्या तीन वर्षांपासून आपल्या शाळेकडे फिरकलेच नाही, तीन वर्षांच्या काळात डिसले गुरुजींनी काय केलं? याबाबत चौकशी समितीचा अहवाल जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाला आहे. प्रशासकीय कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव आणल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी म्हटले आहे.
रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे. याविषयावर संशोधन करण्यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचे आहे. यासाठी दीड महिन्यांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेकडे अध्यापन रजा मिळवण्यासाठी अर्ज केला होता. गुरुवारी जेव्हा टिचर डिसले हे दिलीप स्वामी यांच्याकडे भेटीला गेले होते, तेव्हा सादर केलेल्या अर्जामध्ये त्रुटी असल्याचं सांगितलं गेले होते. त्यांना संबंधित मुख्याध्यापक यांच्याकडे अर्ज देण्यासाठी सांगितले. त्यानंतर शुक्रवारी शाळेवर गेले असता गुरुवारची हजेरी बिनपगारी केली अससल्याचे मुख्याध्यापक यांनी टिचर डिसले यांना सांगितले.