पतीच्या मित्राकडून विवाहितेवर अत्याचार
सातारा : अभ्यास घेण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर मामाने बलात्कार (Rape on Minor Girl) केल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मामाला पोलिसांनी अटक केली आहे. वाई तालुक्यात पश्चिम भागात एका गावात ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उशिरापर्यंत अभ्यास घेण्याच्या बहाण्याने १५ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरी आलेल्या मामाने फिर्यादीच्या घरात झोपलेला असताना मध्यरात्री बलात्कार केला. ही घटना ऑक्टोबर महिन्यात घडली. या प्रकाराबाबत कोणाला सांगू नकोस, अशी धमकी दिली. त्यानंतर नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये फिर्यादीचे घरी जाऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला.
संबंधित मुलीस त्रास होऊ लागल्यावर नातेवाईकांनी रुग्णालयात उपचारासाठी आणले असता ती गरोदर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बाललैंगिक अत्याचार अधिनियमनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र तेलतुंबडे यांनी मामाला गावातून ताब्यात घेतले. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक स्नेहल सोमदे करत आहेत.