Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर ! ‘फडणवीस यांनी पुरावे सादर करावे’

'चौकशी एजन्सीकडून छापे टाकण्यात येतात. याची संपूर्ण माहिती जनतेसमोर यायला हवी. संबंधित व्यक्तीवर ‘एफआयआर’ करून चार्जशिट दाखल व्हायला हवी. जे चौकशी अधिकारी असे करणार नाही त्या अधिकाऱ्यांवरच लुटमारीचा गुन्हा दाखल व्हावा,' अशी आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

  • By Amol Thakre
Updated On: Oct 17, 2021 | 06:25 PM
राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर ! ‘फडणवीस यांनी पुरावे सादर करावे’
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur) : ‘राज्यातील मंत्र्यांकडे वसुलीचे सॉफ्टवेअर (recovery software) असल्याचा आरोप भाजप नेते (BJP leader) आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of Opposition in the Legislative Assembly) देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच केला होता. केवळ आरोप करण्यापेक्षा फडणवीस यांनी पुरावे सादर करावेत,’ असं आव्हान वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी दिलं आहे. ‘लोकही आता याकडे करमणूक म्हणून बघत आहे.

यापूर्वीही फडणवीस यांनी अजित पवार यांच्यावर बेहिशेबी संपत्ती असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांनी सादर केलेले आकडे आले कुठून ? याबाबतही काहीच पुरावे दिले नाही,’ असा टोलाही आंबेडकर यांनी लगावला.

[read_also content=”नागपूर/ ‘छापे टाकून काटा काढत नाही तर, काटा काढून छापा टाकतो’; केंद्रीय मंत्र्यांचा महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल https://www.navarashtra.com/latest-news/if-he-does-not-remove-the-thorn-by-raiding-he-removes-the-thorn-and-raid-union-ministers-attack-leaders-of-mahavikas-aghadi-nrat-193259.html”]

रविभवन येथे पत्रकारांशी संवाद साधताना अ‍ॅड. आंबेडकर यांनी चौकशी एजन्सींचा गैरवापर सुरू असल्याची टीका केली. ‘चौकशी एजन्सीकडून छापे टाकण्यात येतात. याची संपूर्ण माहिती जनतेसमोर यायला हवी. संबंधित व्यक्तीवर ‘एफआयआर’ करून चार्जशिट दाखल व्हायला हवी. जे चौकशी अधिकारी असे करणार नाही त्या अधिकाऱ्यांवरच लुटमारीचा गुन्हा दाखल व्हावा,’ अशी आक्रमक भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे.

‘चौकशी एजन्सीवर बंधने येण्याची गरज आहे. कायद्याने छापा टाकल्यानंतर १९० दिवसांत एफआयआर दाखल होऊन प्रकरण न्यायालयात पोहोचणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांना १०० टक्के सूट देणे चूक आहे. काम करताना अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांचे बाहुले होऊ नये. असे प्रकार सर्रास होत असतानाही अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पाऊल उचलण्यात येत नाही,’ अशी खंत आंबेडकर यांनी व्यक्त केली.

‘हे तर राजकीय छापे’
‘भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारा पक्ष सत्तेत आल्यानंतर ईडीसारख्या संस्थांचा वापर करून छापे टाकतो. मात्र हे छापे शेवटाला जात नाहीत. त्यामुळे हे छापे केवळ राजकीय असल्याची धारणा लोकांमध्ये निर्माण होते. टूजी स्पेक्ट्रम घोटाळ्यातील पुरावेही न्यायालयात सादरच झाले नाहीत. नेत्यांचे राजकीय करिअर संपवण्यासाठी भ्रष्टाचाराचे आरोप केले जातात. चौकशीनंतर त्यांना निर्दोष सोडले जाते, मात्र या काळात राजकीय करिअरला फटका बसत असतो,’ असंही Adv. आंबेडकर म्हणाले.

‘हे पैसे येतात कुठून?’
जिल्हा परिषद सारख्या निवडणुकीतही ७० लाखांपर्यंत खर्च केला जातो. उमेदवारांकडे एवढा पैसा येतो कुठून ? इनकम टॅक्स विभागाने याची चौकशी करावी, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केली. राजकीय भ्रष्टाचाराचे खटले त्वरित निकाली काढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: Recovery software for state ministers devendra fadnavis should present evidence prakash ambedkars direct challenge nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2021 | 06:25 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.