Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजपासून निवासी डॉक्टर संपावर; लाठीहल्ल्याचा निषेध आणि पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागणीसाठी संप

पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या मुद्यावरून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागणीसाठी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११पासून संपावर जाण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे.

  • By Amol Thakre
Updated On: Dec 31, 2021 | 07:30 PM
आजपासून निवासी डॉक्टर संपावर; लाठीहल्ल्याचा निषेध आणि पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागणीसाठी संप
Follow Us
Close
Follow Us:

नागपूर (Nagpur) : पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेच्या मुद्यावरून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या निवासी डॉक्टरांवर पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध आणि पदव्युत्तर प्रवेशाची प्रक्रिया तातडीने सुरू करावी या मागणीसाठी आज ३१ डिसेंबर रोजी सकाळी ११पासून संपावर जाण्याचा निर्णय मार्डने घेतला आहे. सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयांमधील कोव्हिड वॉर्ड व आकस्मिक विभाग वगळता अन्य सेवा बंद करण्याचा निर्णय निवासी डॉक्टरांनी घेतला आहे.

[read_also content=”नागपूर/ ‘थर्टी फर्स्ट’वर निर्बंधांचा अंकुश; नियम मोडल्यास कडक कारवाईचा पोलीस प्रशासनाचा इशारा https://www.navarashtra.com/latest-news/restrictions-on-thirty-first-police-administration-warns-of-stern-action-if-rules-are-broken-nrat-216998.html”]

वैद्यकीय शाखेतील पदव्युत्तर प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेची संपूर्ण प्रक्रिया अजूनही पूर्ण झालेली नाही. त्याचा परिणाम शासकीय रुग्णालयांमधील आरोग्यसेवांवर होत आहे. त्यामुळे ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी या डॉक्टरांची मागणी आहे. त्यासाठीच दिल्लीत आंदोलन सुरू आहे. एमबीबीएसनंतर एमडी किंवा एमएस या पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी प्रवेशप्रक्रिया द्यावी लागते. वास्तविक ही परीक्षा २०२१च्या जानेवारीतच व्हायला हवी होती. मात्र, त्यावेळी ती न घेता मेमध्ये होईल, असे जाहीर करण्यात आले. मेमध्ये कोव्हिडची दुसरी लाट असल्याने ती पुढे ढकलून १२ ऑगस्ट रोजी घेण्यात आली. परीक्षेनंतर पात्र विद्यार्थ्यांचे अखिल भारतीय स्तरावर समुपदेशन होत असते. हा प्रवेशप्रक्रियेचाच भाग असतो.

मात्र, आरक्षणविषयक याचिकांमुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रवेशप्रक्रियेवर अनिश्चित काळासाठी स्थगिती दिली आहे. या प्रवेश प्रक्रियेचे अजून समुपदेशन तर सुरू केलेच नाही, उलट दिल्लीत आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांवर लाठीहल्ला करण्यात आला. त्यांना फरफटत नेण्यात आले, असा संताप सेंट्रल मार्डचे अध्यक्ष डॉ. अविनाश दहीफळे यांनी व्यक्त केला. सेंट्रल मार्डच्या निर्णयानुसार नागपुरातही हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे मेयोमधील मार्डचे अध्यक्ष डॉ. अर्पित धकाते यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

Web Title: Resident doctors on strike from today strike to protest the beating and demand immediate start of postgraduate admission process nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 31, 2021 | 07:30 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.