
भोपाळ: माणूस रागाच्या(Anger) भरात कधीकधी जास्त बोलून जातो. कधीकधी काहीजण रागात असं काहीतरी कृत्य करुन बसतात की नंतर त्यांच्यावर पश्चात्तापाची वेळ येते. मध्य प्रदेशमध्ये(Madhya Pradesh) असाच एक प्रकार घडला आहे. एका वडिलांनी रागाच्या भरात आपल्या मुलाची हत्या (Murder) केली आहे. मुलाने लाईट बिल भरायला नकार दिल्याचा वडिलांना राग आला त्यामुळे त्यांनी मुलाची हत्या(Father killed Son) केल्याचे समजते.
[read_also content=”दुसऱ्या लाटेत ब्राझिल आणि मॅक्सिकोत दुपटीने तर भारतात तिपटीने झाले मृत्यू, सोमवारी जगभरातील ३५ टक्के मृत्यू भारतात https://www.navarashtra.com/latest-news/corona-death-increased-in-second-wave-at-brazil-mexico-and-india-nrsr-127807.html”]
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) छतरपूरमधील ही भयानक घटना घडली आहे. मुलाची हत्या करणारे वडिल तेज बहाद्दूर सिंह हे निवृत्त लष्करी जवान आहेत.ते नौगावमधील आर्मी कॉलनीमध्ये राहतात. त्यांनी सत्येंद्र सिंह बघेल, उर्फ सोनू ( वय- ४०) याच्यावर गोळ्या झाडून त्याची हत्या केली.
सत्येंद्रला त्याच्या नातेवाईकांनी गावातील हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. डॉक्टरांनी प्राथमिक तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. घरगुती वादातून वडिलांनी मुलाचा जीव घेतल्यानं गावातील अनेकांना धक्का बसला आहे. या प्रकरणात तेज बहाद्दूरला अटक करण्यात आली आहे.