झी मराठी (Zee Marathi) वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’(Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमात अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, मराठी चित्रपट, नाटक क्षेत्रासह राजकारणातील ज्येष्ठ मंडळी येत असतात. आता ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात अभिनेता रितेश देशमुख आणि पत्नी जेनेलिया यांची जोडी हजेरी लावणार आहे. नुकताच याचा एक व्हिडीओ(Viral Video Of Ritesh And Genelia) झी मराठीने शेअर केला आहे.
झी मराठीने युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओत चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातील विनोदवीर रितेश देशमुखच्या लय भारी या चित्रपटातील काही सीन रिक्रिएट करताना दिसत आहेत. मात्र ते सीन क्रिएट करण्याची त्यांची विनोदी पद्धत पाहून रितेश आणि जेनेलिया हे दोघेही खळखळून हसताना दिसत आहेत. लय भारी चित्रपटातील आला होळीचा सण लय भारी हे गाणेही फार विनोदी पद्धतीने चित्रित केले आहे.
झी मराठीने इन्स्टाग्रामवरही याबाबतचा एक फोटो शेअर केला आहेत. यात रितेश, जिनिलिया आणि निलेश साबळे हे दिसत आहे. “लई भारी जोडी …! ‘चला हवा येऊ द्या’ मध्ये ..! पाहा या सोमवार ते बुधवार आपल्या थुकरटवाडीत रितेश देशमुख आणि जेनिलिया वहिनी यांची मराठमोळी धमाल…!”चला हवा येऊ द्या,” असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे. दरम्यान रितेश आणि जिनिलिया या कार्यक्रमात येण्यामागचे नेमकं कारण काय आहे? हे अद्याप समोर आले नाही.