
राष्ट्रीय पुरस्कार विजेते संगीतकार रॉकस्टार डीएसपी यांच्या साठी अजून एक खास गोष्ट ठरली आहे.आणि ती म्हणजे ‘पुष्पा 2: द रुल’ मधील त्यांची दोन्ही गाणी एकामागून एक रेकॉर्ड करत आहेत. अलीकडेच ‘पुष्पा पुष्पा’ गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे सर्वाधिक वाजल्या गेलेल्या ५० तेलुगू गाण्यांच्या यादीत पहिले स्थानही मिळवले. आता या गाण्याच्या हिंदी आणि तेलुगु आवृत्तीने जागतिक स्तरावर शीर्ष 100 संगीत व्हिडिओंच्या यादीत 57 वे आणि 79 वे स्थान मिळवले आहे. ज्यामुळे संगीत उद्योगात एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे.
नुकतेच रिलीज झालेले ‘द कपल सॉन्ग’ निःसंशयपणे सर्वात लोकप्रिय ट्रॅक बनले आहे. ‘सूसेकी’ या गाण्याच्या तेलगू आवृत्तीने दुसरे स्थान पटकावले आहे, तर हिंदी आवृत्तीने आठवे स्थान पटकावले आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. “#Pushpa2TheRule ची एक उल्लेखनीय कामगिरी ❤? YouTube ग्लोबल चार्टवर टॉप 100 म्युझिक व्हिडिओंमध्ये 4 गाणी असलेला पहिला चित्रपट बनला आहे ? #पुष्पापुष्पा आणि #TheCoupleSong च्या हिंदी आणि तेलुगू आवृत्त्या जगभरात ट्रेंड करत आहेत.
A remarkable feat by #Pushpa2TheRule ❤? Becomes the first ever film to have 4 songs in the top 100 Music videos on the YouTube global charts ? The Hindi and Telugu versions of #PushpaPushpa & #TheCoupleSong are trending globally ✨#Pushpa2FirstSingle
▶️… pic.twitter.com/RBmEbYqxjb — Pushpa (@PushpaMovie) June 5, 2024
‘पुष्पा 2: द रुल’चे हे अभूतपूर्व संगीतमय यश रॉकस्टार डीएसपीची अपवादात्मक प्रतिभा आणि त्याचे सार्वत्रिक आकर्षण दाखवते. ‘पुष्पा 2: द रुल’ च्या रिलीजसाठी चाहत्यांमध्ये उत्साह निर्माण होत आहे. तसेच संगीतकार डीएसपीकडे अनेक चित्रपट आहेत. त्याची 2024 म्युझिकल लाइनअप सुरियाचा ‘कंगुवा’, राम चरणचा ‘RC 17’, पवन कल्याणचा ‘उस्ताद भगत सिंग’, अजित कुमारचा ‘गुड बॅड अग्ली’, धनुषचा ‘कुबेरा’ आणि नागा चैतन्यचा ‘टीधन’ यांसारख्या उच्च-बजेट प्रकल्पांसह चमकरणार आहे.
[read_also content=”रॉकस्टार डीएसपीचे ‘पुष्पा पुष्पा’ आणि ‘पुष्पा 2: द राइज’ मधील ‘द कपल सॉंग’ ही गाणी बनली ग्लोबल चार्टबस्टर https://www.navarashtra.com/entertainment/rockstar-dsps-pushpa-pushpa-and-the-couple-song-become-global-chartbusters-542139/”]