(फोटो सौजन्य- Social media)
बॉलिवूडचा दबंग खान अर्थात सलमान खानच्या अमेरिका दौऱ्याची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. अशा चर्चा सुरू होत्या की, भाईजान यावर्षी अमेरिकेत कॉन्सर्ट करणार आहे. पण या सर्व अफवा असून आता या चर्चांवर दस्तुर खुद्द सलमान खानने सोशल मीडियाच्या माध्यमातून या बातम्या अफवा असून फसवणूक असल्याचे म्हटले आहे. सलमान खानने चाहत्यांना सांगितले की, टूरबद्दल सुरू असणाऱ्या गोष्ट पूर्णपणे खोट्या आहेत. .
हे देखील वाचा – ‘रात जवां है’मधील भूमिकेतून अभिनेत्री अंजली आनंद काय शिकली ? स्वत: शेअर केला अनुभव
गेल्या काही दिवसांपूर्वी, येत्या ५ ऑक्टोबरला सलमान अमेरिकेच्या आर्लिंग्टन थिएटरमध्ये परफॉर्म करणार अशी अफवा पसरली होती. भाईजानची ही टूर खोटी असून त्याने चाहत्यांना माझ्या नावावर मोठा घोटोळा सुरु असून कृपया तुम्ही, या जाळ्यात फसू नका. अशी विनंती केली आहे. सलमान खानने दिलेल्या माहितीनुसार, यावर्षी त्याचा अमेरिकेत कोणताही कार्यक्रम करण्याचा किंवा प्रवास करण्याचा कोणताही विचार नाही. तो म्हणाला की, माझ्या टूरबद्दलच्या कोणत्याही फसव्या कॉल किंवा ईमेलवर विश्वास ठेवू नका, अशी पोस्ट त्याने स्वत: त्याच्या सोशल मिडिया हँडलवरून शेअर केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये सलमान खान म्हणतो, “सलमान खान आणि अफिलेट कंपनी किंवा टीमकडून अमेरिकेमध्ये यावर्षी कोणत्याच कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलेलं नाही. शोमध्ये सलमान खान परफॉर्म करेल असं देखील सांगण्यात येत आहे. परदेशात होणाऱ्या कार्यक्रमाच्या फक्त अफवा आहेत. कृपया अशा कोणत्याही कार्यक्रमांना प्रोत्साहन देणाऱ्या फोन कॉल्स, मेसेज, ई-मेलवर किंवा जाहिरांतीवरही विश्वास ठेऊ नका. जर कोणी सलमानच्या नावाचा गैरवापर करताना आढळून आलं, तर त्याच्यावर त्वरित कायदेशीर कारवाई केली जाईल.”
हे देखील वाचा – आगळ्या नवरा-नवरीची वेगळी लव्हस्टोरी, केव्हा उलगडणार गुपित
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर, सध्या भाईजान टेलिव्हिजन रिॲलिटी शो ‘बिग बॉस १८’च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ए.आर.मुरुगादास दिग्दर्शित ‘सिकंदर’चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे. चित्रपटात भाईजानसोबत रश्मिका मंदान्ना, काजल अग्रवाल, प्रतिक बब्बर आणि सुनील शेट्टी सुद्धा दिसणार आहे. चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान रश्मिकाने ‘सिकंदर’च्या सेटवरून गेल्या काही दिवसांपूर्वी शुटिंग दरम्यानचा एक फोटोही शेअर केला होता. साजिद नाडियादवाला चित्रपटाची निर्मिती करणार असून हा चित्रपट 2025 च्या ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे. सलमान ‘सिकंदर’च्या व्यतिरिक्त ‘पवनपुत्र भाईजान’, ‘इन्शाअल्लाह’, ‘नो एंट्री २’ ‘किक २’, ‘दंबग ४’ आणि ‘वांटेड २’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.