(फोटो सौजन्य- इंस्टाग्राम)
या फॅशनच्या युगात बी-टाउन अभिनेत्री सान्या मल्होत्रा तिच्या अनोख्या फॅशन ने प्रेक्षकांची मन जिंकत आहे. अलीकडेच ‘मिसेस’ साठी तिला खूप प्रेम आणि कौतुक मिळाले आहे आणि तिने तिच्या या खास लूक्स ची झलक सोशल मीडिया वर शेअर केली आहे. सान्याने सोनेरी रंगाची साडी नेसून ब्रेस्टप्लेटसह पारंपारिक ब्लाउजमध्ये तिचा हा पारंपरिक वेस्टर्न लूक दाखवताना दिसली आहे. अभिनेत्रीने हे फोटो तिच्या इंस्टाग्राम हँडलवर शेअर केले असून, चाहत्यांनी या फोटोला खूप प्रतिसाद दिला आहे.
सान्याने या शेअर केलेल्या फोटोमध्ये खूप सुंदर आणि आकर्षित दिसत आहे. तसेच तिने या सोनेरी रंगाच्या साडीवर खूप साधा सोपा मेकअप केला असून, तिने कानामध्ये मोठे गोल्डन झुम्मके आणि हातात नाजूक आंगठी घातली आहे. तसेच अभिनेत्रीचा हा लुक कोणत्याही पारंपरिक कार्यक्रमासाठी परफेक्ट आहे.
सध्या सान्या मल्होत्रा ‘मिसेस’ च्या यशाचा आनंद लुटत आहे. ज्याचा नुकताच मेलबर्नच्या प्रतिष्ठित भारतीय चित्रपट महोत्सवात प्रीमियर झाला. आरती कडव दिग्दर्शित या चित्रपटाला स्टँडिंग ओव्हेशन मिळाले, तर सान्याला प्रामाणिक अभिनयासाठी कौतुक मिळाले. या वर्षाच्या सुरुवातीला, तिला ‘मिसेस’ या मल्याळम चित्रपट ‘द ग्रेट इंडियन किचन’ चा रिमेक असलेल्या तिच्या भूमिकेसाठी न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. या संपूर्ण यशासाठी अभिनेत्री खूप खुश आहे आणि तिला स्वतःचा खूप अभिमान देखील वाटत आहे.
हे देखील वाचा- IMDb लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत ‘स्त्री 2’चे कलाकार आघाडीवर!
कामाच्या आघाडीवर, सान्या मल्होत्रा आरती कडव दिग्दर्शित ‘मिसेस’ च्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहे. सान्याला अलीकडेच प्रतिष्ठित न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘मिसेस’साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये रॅव्ह रिव्ह्यू मिळवणारा हा चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. याशिवाय, ती ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’, ‘ठग लाइफ’ आणि अनुराग कश्यपसोबत अनटाइटल्ड प्रोजेक्टमध्येही दिसणार आहे.