Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

औरंगाबादमध्ये स्वयंघोषित डॉनची भर चौकात दगडाने ठेचून हत्या, बदल्याच्या भावनेने खून झाल्याचा संशय

विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे (Vishal Phate murder) या स्वंयघोषित डॉनची (self proclaimed don)  हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे.

  • By साधना
Updated On: May 22, 2021 | 03:43 PM
औरंगाबादमध्ये स्वयंघोषित डॉनची भर चौकात दगडाने ठेचून हत्या, बदल्याच्या भावनेने खून झाल्याचा संशय
Follow Us
Close
Follow Us:

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील वाळूज येथील बजाजनगर परिसरात गुन्हेगार आणि खूनातील आरोपी विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे (Vishal Phate murder) या स्वंयघोषित डॉनची (self proclaimed don)  हत्या (Brutal murder) करण्यात आली आहे.

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही अज्ञात तरुणांनी महाराणा प्रताप चौकात मृत विशालला गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली आहे. मृत विशालनं एक वर्षापूर्वी अशाच पद्धतीनं एका युवकाचा खून केला होता. त्यामुळे बदल्याच्या भावनेतून स्वयंघोषित डॉन विशाल फाटेची हत्या करण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

[read_also content=”मुंबई पोलिसांच्या कल्पनाशक्तीला तोड नाही, कोरोनाविषयक जनजागृतीसाठी तयार केले बॉलिवूड कलाकारांचे मीम्स – एकदा हे बघाच https://www.navarashtra.com/latest-news/mumbai-police-made-memes-of-popular-actors-of-bollywood-for-bebollygood-mission-nrsr-132449.html”]

गेल्या वर्षी वडगावतील योगेश प्रधान खून प्रकरणातही विशालचा सहभाग होता. वर्षभर कारागृहात राहिल्यानंतर १५ दिवसांपूर्वीच तो घरी आला होता.

शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास काही तरुण एका तरुणाला बेदम मारत असल्याची माहिती वाळूज एमआयडीसी पोलिसांना मिळाली. या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी एक तरुण रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला. त्याच्या बाजूला रक्ताने माखलेले दोन दगडदेखील होते. पोलिसांनी जखमी विशाल फाटेला घाटी येथील रुग्णालयात दाखल केलं, पण उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं आहे. विशाल फाटे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे.

विशाल उर्फ मड्ड्या किशोर फाटे हा वडगाव कोल्हाटी येथील रहिवासी असून तो स्वतःला वाळूजचा स्वयंघोषित डॉन समजायचा. नेहमी नशेत राहणारा विशाल स्वतःजवळ सतत चाकू बाळगायचा. त्यानं दोन दिवसांपूर्वी वाळूज येथील एका मासे विक्रेत्याला चाकूचा धाक दाखवत फुकटात मासे नेले होते.तसेच २०२१ साली दुचाकी जळीतकांडातही मुख्य सूत्रधार म्हणून विशालला अटक करण्यात आलं होतं. त्याच्याविरोधात मारहाण, लूटमार, खून असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो ज्या परिसरात वास्तव्याला होता, तेथील नागरिकही त्याच्या त्रासाला कंटाळले होते.

मृत विशालनं अन्य तिघांच्या मदतीनं १७ मे २०२० रोजी दुपारी वडगाव कोल्हाटी येथील योगेश प्रधान नावाच्या एका युवकाची डोक्यात दगड घालून आणि शस्त्रानं वार करून निर्घृण हत्या केली होती. अगदी याचं पद्धतीनं विशालचीही हत्या करण्यात आली आहे. त्यामुळे विशालची हत्या बदलेच्या भावनेतून झाली असावी, असा संशय पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे.

Web Title: Self declared don vishal alias maddya kishor fate killed in aurangabad nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2021 | 03:33 PM

Topics:  

  • aurangabad
  • don

संबंधित बातम्या

FWICE च्या कारवाईनंतर पहिल्यांदाच समोर आला Ranveer Singh, सोडले मौन; म्हणाला, ‘मी नेहमीच सन्मान करतो…’
1

FWICE च्या कारवाईनंतर पहिल्यांदाच समोर आला Ranveer Singh, सोडले मौन; म्हणाला, ‘मी नेहमीच सन्मान करतो…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.