नवी दिल्ली: काही महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांनी मेसच्या काही भागांना ‘केवळ शाकाहारी’ (vegetarian) म्हणून अनधिकृतपणे चिन्हांकित केल्यामुळे IIT-बॉम्बेमध्ये जातिभेदावरुन चांगलाच आरोप प्रत्यारोप होत होता. या घटनेच्या काही महिन्यांनंतर, कॅम्पस वसतिगृह आणि मेस प्रशासनाने आता अधिकृतपणे वसतिगृहात राहणाऱ्यांसाठी सामान्य मेसच्या जागेत स्वतंत्र जागा मंजूर केली आहे, जिथे फक्त शाकाहारी भोजन करणारे लोकच बसू शकतात.
[read_also content=”शारिरिक संबधास प्रेयसीचा नकार, प्रियकरानं मित्रांसह केली हत्या; त्यानंतर मृतदेहावर आळीपाळीनं अत्याचार https://www.navarashtra.com/crime/boyfriend-arrested-for-killed-girlfriend-after-she-refuse-to-have-physical-relation-nrps-463300.html”]
द हिंदूच्या वृत्तानुसार, या वर्षी जुलैमध्ये मेसच्या एका विभागाला ‘केवळ शाकाहारी’ म्हणून चिन्हांकित करण्यावरून झालेल्या वादानंतर, हॉस्टेल मेसच्या सरचिटणीसांनी मेसमध्ये कोणतीही जागा खुली नसल्याची माहिती देणारा ईमेल पाठवला होता. तसेच, कोणीही जागा राखीव ठेवू शकत नाही किंवा कोणालाही वगळण्याचा प्रयत्न करू शकत नाही, असं म्हण्टलं.
या घटनेनंतर, वसतिगृह आणि मेसच्या प्रशासकांनी मांस किंवा अंडी खाणार्या व्यक्तीसोबत टेबल सामायिक करण्याशी संबंधित समस्यांबद्दल तक्रारी करण्यास सुरुवात केली. यानंतर मेसची जागा सामायिक करणाऱ्या १२, १३ आणि १४ वसतिगृहांच्या वॉर्डन आणि मेस समुपदेशकांसोबत अनेक बैठका झाल्या. त्यानंतर, अधिकृतरित्या १२, १३ आणि १४ वसतिगृहांमध्ये केवळ शाकाहारी जेवण करणाऱ्यांसाठी वेगळी जागा देण्यात आली आहे.