Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुरूषांनो, पहिल्यांदा ‘सेक्स’ करताना ठेवा या ‘८’ गोष्टींचे भान; अन्यथा…

पुरूषांनी पहिल्यांदा सेक्स करताना कोणती काळजी घ्यावी? हे जाणून घेऊया.

  • By Vivek Bhor
Updated On: Nov 05, 2020 | 03:37 PM
sex guide for males in marathi Here are eight things men should keep in mind when having sex for the first time

sex guide for males in marathi Here are eight things men should keep in mind when having sex for the first time

Follow Us
Close
Follow Us:

पहिल्या सेक्स अनुभवाबद्दल प्रत्येकाच्याच काही कल्पना, आशा आणि अपेक्षा असतात. मात्र वास्तव अनेकदा वेगळं असतं. जोडप्यांमधला बुजरेपणा, भीती किंवा अवघडलेपण यामुळे परिस्थिती बिघडू शकते. म्हणूनच पहिल्यांदा सेक्स करताना पुरूषांनी या काही गोष्टींचे जरूर भान ठेवायलाच हवे.

१ ) कंडोम विसरू नका

पहिल्यांदा सेक्स करताना सर्वात आधी येते ती सुरक्षितता. ही बाबदेखील महत्त्वाची आहे. बरेचदा पुरुष उत्साहाच्या भरात सुरक्षेचा विचार करतच नाहीत, परिणामी लैंगिक आजार किंवा अनावश्यक गर्भधारणा होण्याची शक्यता अधिक असते म्हणूनच कंडोम आवर्जून जवळ ठेवावा.

२ ) त्या क्षणांचा आनंद घ्या

शारिरीक गरज ही अनेकदा अहंकाराची गोष्ट बनते आणि यामुळे सारे काही विस्कटून जाते. चित्रपटात किंवा पॉर्न फिल्ममध्ये दाखवल्या जाणार्‍या गोष्टी हे फक्त रंजित व काल्पनिक स्वरूप असते म्हणून या गोष्टींचे अनुकरण करणे टाळा व तुमच्या साथीदारासोबत केवळ ‘त्या’ सुंदर क्षणांचा सुखद अनुभव घ्यायला शिका.

३ ) कामक्रिडेला वेळ द्या, ती आजची गरज आहे

पुरूष कामक्रीडेला वेळ देत नाहीत ही तक्रार बर्‍याच स्त्रियांची असते. प्रत्याक्षात संभोग करण्यापूर्वी कामक्रीडा करणे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. चुंबन, स्पर्श, ओरल सेक्स यासारख्या गोष्टींना देखील पुरेसा वेळ द्या. व यातून वातावरणनिर्मीती करा तसेच स्त्रियांना संभोगातून योग्य प्रमाणात ऑर्गेझम ( परमोच्च संभोगसुख) मिळेल याची काळजी घ्या.

४ ) काही वेळेस त्रास होण्याची शक्यता अधिक असते

काही वेळेस पहिल्यांदा सेक्स करताना त्रास होण्याची शक्यता अधिक असते. तुमचे शिश्न संवेदनशील असू शकते किंवा कदाचित तुमच्या साथीदाराला वेदना होऊ शकतात. पहिल्या सेक्सच्या वेळेस वेदना होणे हे अगदी सामान्य आहे. दर पाच पैकी एका स्त्रीला असा त्रास होतोच. बर्‍याचदा शुष्क योनीमार्गामुळे हा त्रास होऊ शकतो म्हणूनच योग्य ती काळजी घ्या.

५ ) गैरसमजांच्या आहारी न जाता त्यांना तिलांजली द्या

पहिल्यांदा संभोग करताना स्त्रियांमध्ये रक्तस्त्राव होतोच हा गैरसमज आहे. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येक स्त्रीला रक्तस्त्राव होतोच असे काही नाही. कारण स्त्रीच्या योनीमार्गाच्या मुखाशी असलेला ‘हायमेन’ नामक अतिशय नाजुक पडदा (tissue) धावणे, सायकल चालवणे, उड्या मारणे किंवा अगदी स्विमिंग सारख्या व्यायाम प्रकारातूनही अगदी सहज फाटू शकतो. तर काही जणींमध्ये हा पडदा जन्मजातच नसतो. त्यामुळे रक्तस्त्रावाचा स्त्रीच्या पावित्र्याशी संबंध लावणे टाळा.

६ ) संवादाने जवळ या

सेक्स करण्यापूर्वी जोडप्यांमध्ये पुरेसा मोकळेपणा नसतो. याचा परिणाम लैंगिक सुखावर होतो. त्यामुळे एकमेकांशी संवाद साधा. एकमेकांची आवडनिवड जाणून घ्या. शारीरिक संबंधाविषयी एकमेकांच्या अपेक्षा जाणून घ्या. भीती, शंका दूर करा. म्हणजे पहिल्यांदा सेक्स करताना कोणत्याही प्रकारचं दडपण राहणार नाही.

७ ) शीघ्रपतनाची समस्या

पहिल्यांदा सेक्स करताना शीघ्रपतनाची किंवा शिश्नाची ताठरता न राहण्याची समस्या उद्भवू शकते मात्र हळूहळू योनी व शिश्न यांचा संबंध वाढला की,शीघ्रपतनाची समस्या कमी होते. शीघ्रपतनासोबतच शिश्नाची ताठरता न राहणे ही समस्यादेखील मानसिक तणावामुळे आढळून येते. मात्र हळूहळू ही समस्यादेखील नाहीशी होईल. पण दीर्घकाळ ही समस्या राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण ही समस्या रक्तदाब किंवा हृदयरोगाचे लक्षण असण्याची शक्यता असते.

८ ) हळूहळू परिस्थिती सुधारेल

पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकजण १००% यशस्वी होतोच असे नाही. त्यामुळे कोणतीही घाई न करता प्रत्येक क्षणांचा आनंद घ्या व अनुभवांतून शिकत तो अधिकाधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न करा.

Web Title: Sex guide for males in marathi here are eight things men should keep in mind when having sex for the first time

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2020 | 03:36 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.