संभाजीनगर: लोकसभेत अपेक्षित यश मिळू शकले नसलं तरी विधानसभेत भाजप आणि मित्रपक्ष मिळून पुन्हा विधानसभेवर भगवा ध्वज फडकवू असा संकल्प कालच्या बैठकीत केला आहे. आम्ही पहिल्यापेक्षा अधिक जागा महाराष्ट्रात जिंकू आणि मराठवाडा व विदर्भात सर्वाधिक जागा जिंकू. असा विश्वस आम्ही अमित शाह यांना दिला. जागावाटप बाबत आमचे नेते आणि अमित शाह यांच्यात चर्चा सुरू आहे, जागावाटपात आमच्या आणि मित्र पक्षात कोणताही वाद नाही, सामोपचाराने चर्चा होत आहे. ज्यावेळी अंतिम निर्णय होईल तेव्हा या कोणती जागा कोण वाढवेल हे आम्ही जाहीर करू. लवकरच जागावाटपाचा विषय संपेल आणि उमेदवाऱ्या जाहीर होतील, अशी माहिची माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली .
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. विधानसभा निवडणुकीची तयारी कऱण्यासाठी हा दौरा आयोजित केला आहेत. साधारणत: विदर्भ, मराठवाडा, नाशिक आणि कोल्हापूर याठिकाणी बुथ प्रमुखांपासून, जिल्हाध्यक्ष ते आमदार- खासदार 1000 कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी मार्गदर्शन केले. आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्याची रचना तयार करण्यात आल्याचे रावसाहेब दानवे यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: मराठा बांधवांसाठी आनंदवार्ता! मनोज जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण स्थगित
रावसाहेब दानवे म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे. पण उद्धव ठाकरे, शरद पवार यांची मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत दुटप्पी भूमिका आहे.मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसीतून आरक्षण मागत आहेत, तर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे. पण राजकीय फायद्यासाठी मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी शरद पवार आणि ठाकरे मागणी करत आहेत. मग मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ, अशी भूमिका शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट करावी. पण ते अस्पष्टपणे बोलतात. म्हणून शरद पवार यांची भूमिका संदिग्ध वाटते. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे असे शरद पवार म्हणाले, पण कोणाच्या आरक्षणाला धक्का न लागता त्यांची भूमिका आहे. पण जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायचे असेल तर त्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात ते स्पष्ट करावे.
हेही वाचा: जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका, 26 जागांवर 239 उमेदवार रिंगणात,