Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मल्टिनॅशनल कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; १४ ग्राहकांना ८६ लाखांनी लुटले, वाचा सविस्तर…

ई-गेम एशिया कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १४ ग्राहकांना ८६ लाख रुपयांनी गंडा घालून फरार झालेला ठगबाज सुदत्त रामटेक (वय ४६ रा. लक्ष्मीनगर) याला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी गोवा येथे अटक केली.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jun 30, 2021 | 10:28 PM
मल्टिनॅशनल कंपनीत गुंतवणुकीचे आमिष; १४ ग्राहकांना ८६ लाखांनी लुटले, वाचा सविस्तर…
Follow Us
Follow Us:

नागपूर (Nagpur).   ई-गेम एशिया कंपनीत गुंतवणुकीचे आमिष दाखवून १४ ग्राहकांना ८६ लाख रुपयांनी गंडा घालून फरार झालेला ठगबाज सुदत्त रामटेक (वय ४६ रा. लक्ष्मीनगर) याला आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी गोवा येथे अटक केली. याप्रकरणात पोलिसांनी कंपनीचा अन्य संचालक लोकेश जर्नादन वाघमारे याला आधीच अटक केली. सध्या तो कारागृहात आहे.

[read_also content=”नागपूर/ विदर्भातील डेल्टा प्लस विषाणूचा शास्त्रीय अभ्यास होणार; १०० नमुने तपासणीसाठी ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळे’कडे रवाना नागपूर/ विदर्भातील डेल्टा प्लस विषाणूचा शास्त्रीय अभ्यास होणार; १०० नमुने तपासणीसाठी ‘राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळे’कडे रवाना”]

सुदत्त व लोकेश या दोघांनी ई-गेम एशिया नावाच्या कंपनीसारखीच दिसणारी वेबसाइट तयार केली. यात लुडो, फुटबॉल, क्रिकेट, टेबल पूल ,कॅरमसह १८ खेळ ऑनलाइन खेळले जातात. गजाननगर टी पॉइंट येथे दोघांनी कंपनीचे कार्यालय स्थापन केले. कंपनीत गुंतवणूक केल्यास १३ ते २० टक्क्यांपर्यंत नफा मिळवून देण्याचे आमिष त्यांनी ग्राहकांना दाखविले. साडेतीन हजार रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंतच्या विविध योजना सादरा केल्या. साडेतीन ते अकरा हजार रुपये जमा केल्यास पहिल्या १५ महिन्यांपर्यंत १३ टक्के तर ५३ हजार व त्यापेक्षा अधिक रक्कम जमा केल्यास १६ ते २० टक्के व्याज देण्याचे आमिष दोघांनी ग्राहकांना दाखविले. या योजनांमध्ये १४ ग्राहकांनी ८६ लाख रुपये गुंतविले.

[read_also content=”Corona Update Nagpur/ नागपुरात बुधवारी १६ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची नोंद; तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न https://www.navarashtra.com/latest-news/16-corona-positive-patients-registered-in-nagpur-on-wednesday-every-effort-is-made-to-prevent-the-third-wave-nrat-149253.html”]

मुदत संपल्यानंतर दोघांनी गुंतवणूकदारांना पैसे परत केले नाही. कार्यालय बंद करून दोघेही पसार झाले. डॉ. सपना पंकज पाटील यांनी आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार केली. एप्रिल महिन्यांत धंतोली पोलिस स्टेशनमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच दोघेही पसार झाले. पोलिसांनी वाघमारे याला अटक केली. सुदत्त हा फरार होता.

तो गोव्यातील एका हॉटेलमध्ये असल्याची माहिती आर्थिक गुन्हेशाखेचे उपायुक्त विवेक मसाळ यांना मिळाली. मसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे, हेडकॉन्स्टेबल प्रशांत किंदर्ले, भारत ठाकूर व धीरज गायकवाड गोवा येथे गेला सापळा रचून सुदत्त याला अटक केली. त्याला नागपुरात आणले.

पोलिसांनी सुदत्त याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची १ जुलैपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली. फसवणुकीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या ग्राहकांनी सिव्हिल लाइन्स येथील प्रशासकीय इमारतीत आर्थिक गुन्हेशाखा कार्यालयात तक्रार करावी, असे आवाहन पोलिस निरीक्षक महेंद्र अंभोरे यांनी केले.

Web Title: Shocking the lure of investing in a multinational company 86 lakh robbed 14 customers read more nrat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2021 | 10:28 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.